-
इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.
-
आगामी वर्षासाठी भारत G-20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे.
-
बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी २० परिषदेत मोदींसह अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
-
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची मोदींनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
-
जी २० परिषदेनिमित्त पुणे विद्यापीठात जोरदार तयारी करण्यात येत आहे.
-
जी २० परिषदेनिमित्त विद्यापीठ आवाराच्या काही भागाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आहे.
-
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस पांढऱ्या कापडाने झाकण्यात आले आहे.
-
तसेच रोषणाईसाठी दिवे बसण्याचे काम सुरू आहे.
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ब्रिटिशकालीन इमारतीचा अनुभव जी २० देशांतील पाहुण्यांना घेता येणार आहे.
-
दीडशे वर्ष जुनी ऐतिहासिक वास्तू, भुयार, विविध संग्रहालये, विद्यापीठ परिसरातील जैवविविधतेचे दर्शन पाहुण्यांना ‘हेरिटेज वॉक’द्वारे घडवण्यात येणार आहे.
-
जी २० परिषदेनिमित्त विद्यापीठ परिसराच्या आवारात मोठे बॅनरही लावण्यात आले आहेत.
-
प्रवेशद्वारापासून मुख्य इमारतीपर्यंतच्या मार्गावरील वाढलेल्या झाडांची छाटणीही करण्यात आली आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ