-
मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ‘ईडी’ने समन्स बजावले आहे आणि १६ जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना सूचक इशारा दिला आहे. (सर्व छायाचित्रे संग्रहीत)
-
संजय राऊत म्हणाले, “इक्बालसिंह चहल यांनी इतके दिवस संजय राऊत आणि त्यांचे घोटाळेबाज पार्टनरला वाचवण्यासाठी का धडपड केली.?”
-
“१०० कोटींचा घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा, हजारो कोविड रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचं पाप संजय राऊत यांच्या पार्टनरने केलं.”
-
“त्यांना वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल एवढी धडपड करतात, मला मान्य नाही.”
-
“मी ईडी, आयकर विभाग, कंपनी मंत्रालय, मुंबई पोलीस, कॅग अशा पाचही संस्थाना आग्रही केला आहे. या पाचही संस्था या घोटाळ्याची चौकशी करत आहेत.”
-
“मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हे टेंडर पास केलं. त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पण जाब द्यावाच लागणार.”
-
“ते कुणासाठी नोकरी करत होते मातोश्रीसाठी की मुंबईच्या जनतेसाठी?”
-
“माझ्याकडे सगळ्या फाईल्स आणि कागदपत्रं आहेत. कुठली कंपनी अस्तित्वात नाही, कुठलं टेंडर निघालं नाही.”
-
“फक्त मातोश्रीवरून फोन येतो म्हणून संजय राऊतांच्या बेनामी कंपनीच्या पार्टनरला १०० कोटींचं कंत्राट.”
-
“इक्बालसिंह चहल असो किंवा आणखी अधिकारी असो त्यांना या प्रश्नांचे उत्तर द्यावच लागणार आहे.”
-
“ईडी असो ईओडब्ल्यूने चौकशी सुरू केली आहे. आयकर विभागानेही चौकशी सुरू केली आहे. कंपनी मंत्रालयाने या कंपनीच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.”
-
“कोविडची कमाई इथेच चुकती करावी लागणार.”
-
“मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल, त्यांचे सरकारी आणि तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी मुंबई महापालिकेतील घोटाळ्याची चौकशी होऊ नये, यासाठी अनेक प्रयत्न केले.”
-
“मी मुंबई महापालिका आयुक्तांना आव्हान दिलं होतं ही देशात लोकशाही आहे आणि याची चौकशी होणारच आहे. त्याप्रमाणे चौकशी सुरू झाली आहे.”
-
करोनाकाळात मुंबई पालिकेने उभारलेल्या करोना केंद्रांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यामध्ये संजय राऊत यांच्यासह त्यांचे पार्टनर सुजीत पाटकरांचं नाव आहे.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO