-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एलजीबीटीक्यू (LGBTQ+) समूहाबाबत मोठं विधान केलं.
-
“आपल्या समाजात आधीपासून एलजीबीटीक्यू समाज आहेत,” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.
-
तसेच याचं उदाहरण म्हणून त्यांनी जरासंधाचे दोन सेनापती हंस आणि डिंभकचं उदाहरण दिलं.
-
ते ९ जानेवारीला संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी नेमकी काय विधानं केली याचा हा आढावा…
-
काही लहान लहान प्रश्न मध्ये मध्ये येत असतात. मात्र, माध्यमं त्या प्रश्नांना फार मोठं करून दाखवतात – मोहन भागवत
-
कारण कथिक नव्या डाव्या विचाराच्या लोकांना ती गतिशीलता वाटते. तो प्रश्न म्हणजे एलजीबीटीचा प्रश्न. मात्र, हा प्रश्न आजचा नाही – मोहन भागवत
-
आपल्या समाजात आधीपासून हे समूह आहेत, पण आजपर्यंत कधी त्यांचा आवाज झाला नाही. ते लोक जगत राहिले – मोहन भागवत
-
आपल्या समाजाने विना आरडाओरडा करता एलजीबीटी समूहाला सह्रदयपणे स्वीकारलं – मोहन भागवत
-
तेही एक जीव आहेत आणि त्यांनाही जीवन जगायचं आहे हा विचार करून त्यांना समाजात सामावून घेण्याचा एक मार्ग काढला – मोहन भागवत
-
आपल्या समाजात तृतीयपंथी लोकांना जागा आहे. तृतीयपंथी हा प्रश्न नाही, तर तो एक समूह आहे – मोहन भागवत
-
तृतीयपंथीयांचे देवी-देवताही आहेत. सध्या तर त्यांचे महामंडलेश्वरही आहेत. ते कुंभात येतात आणि त्यांना तेथे जागाही मिळते – मोहन भागवत
-
एलजीबीटी समूह समाजाचा भाग आहेत. घरात बाळाचा जन्म झाल्यावर ते गाणं म्हणायला येतात – मोहन भागवत
-
परंपरेत त्यांना सामावून घेतलं आहे. त्याचं जगणं वेगळंही सुरू असतं आणि काही ठिकाणी ते समाजाशीही जोडले जातात – मोहन भागवत
-
आम्ही त्यावर कधी आरडाओरडा केला नाही. आम्ही त्याला आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय केलं नाही. असाच एलजीबीटीचा प्रश्न आहे – मोहन भागवत
-
जरासंधाचे दोन सेनापती होते. हंस आणि डिंभक. ते इतके मित्र होते की कृष्णाने अफवा पसवली की, डिंभकाचा मृत्यू झाला, तर हंसाने आत्महत्या केली. त्यांनी दोन सेनापतींना असं मारलं – मोहन भागवत
-
हंस आणि डिंभक दोघांचे असेच एलजीबीटीप्रमाणे संबंध होते – मोहन भागवत
-
आपल्याकडे हा समूह होताच. माणूस निर्माण झाला तेव्हापासून एलजीबीटी हा माणसाचा एक प्रकार आहेच – मोहन भागवत
-
मी जनावरांचा डॉक्टर आहे, तर जनावरांमध्येही एलजीबीटीप्रमाणे प्रकार असतात – मोहन भागवत
-
ही एक बायोलॉजिकल अवस्था आहे. एलजीबीटी समूह त्याचाच भाग आहे – मोहन भागवत
-
मात्र, त्याचा फार मोठा प्रश्न तयार करण्यात आला. तेही समाजाचा भाग आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे – मोहन भागवत
-
त्यांना त्यांचा एक खासगी अवकाशही मिळावा आणि त्यांना इतर समाजाप्रमाणे आम्हीही आहोत असं वाटावं असा सहभागही करता यावा – मोहन भागवत
-
आपली परंपरा कोणताही आरडाओरडा न करता एलजीबीटी समुहाची व्यवस्था करत आली आहे – मोहन भागवत
-
असाच विचार पुढेही करावा लागेल. कारण इतर गोष्टींनी उत्तर सापडलेलं नाही आणि सापडणारही नाही, हे स्पष्ट होत आहे – मोहन भागवत
-
त्यामुळे संघ आपल्या अनुभवाला विश्वासार्ह मानून काम करत आहे – मोहन भागवत
-
दरम्यान, याआधी चार वर्षांपूर्वीही मोहन भागवत यांनी एलजीबीटी समाजाबद्दल अशीच भूमिका व्यक्त केली होती. ते काय म्हणाले होते याचा आढावा खालीलप्रमाणे…
-
एलजीबीटी समुदायाचे लोक हिंदू परंपरेमध्येही होते. ते समाजाचाच भाग आहे – मोहन भागवत
-
त्यांची व्यवस्था करण्याचं काम समाजाने करायला हवं – मोहन भागवत
-
आपल्या परंपरेत, आपल्या समाजात एलजीबीटी समुदायाची व्यवस्था करण्याचं काम झालेलं आहे – मोहन भागवत
-
आता काळ बदलला आहे, तर त्यासाठी वेगळी व्यवस्था तयार करावी लागेल – मोहन भागवत
-
सर्व छायाचित्र – संग्रहित

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”