-
पुण्यात आज(शनिवार) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला.(फोटो सौजन्य – पवन खेंगरे, सागर कासार)
-
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली.
-
यामध्ये शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला.
-
नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शिवराज राक्षेला मानाची गदा प्रदान करण्यात आली.
-
शिवराजने माजी विजेत्या हर्षवर्धनला ८-१ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.
-
तर महेंद्रने वाशिमच्या सिकंदर शेखचा ६/४ असा पराभव केला होता.
-
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ब्रिजभूषण सिंह, भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती.
-
अंतिम फेरीत पोहचलेले दोन्ही मल्ल हे पुण्याच्या एकाच तालमीत तयार झालेले आहेत.
-
वस्ताद काका पवार व गोविंद पवार यांच्या कात्रजमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीतील हे कुस्तीपटू आहेत.
-
महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे यास चांदीची गदा, रोख पाच लाख रुपये आणि महिंद्रा थार ही गाडी बक्षीस रुपात मिळाली आहे.
-
तर, उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपये बक्षीस मिळाले आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटूंना एक आनंदाची बातमी दिली.
-
आपल्या भाषणात त्यांनी राज्य सरकारने कुस्तीपटूंचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले.
-
देवेंद्र फडणीस म्हणाले, महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करेल.
-
आम्ही अशाप्रकारचे खेळाडू तयार करू, की येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा कोणता ना कोणता मल्ल, कुस्तीपटू हा महाराष्ट्राचा असेल.
-
त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि आमचे क्रीडामंत्री गिरीश महाजन निश्चितपणे यासाठी पुढाकार घेतील.
-
हे खरच आहे की, आपल्या कुस्तीपटूंना आपण अत्यल्प मानधन देतो व मागील दोन वर्षांपासून तेही बंद आहे.
-
म्हणून मी मुख्यमंत्र्यांशी व क्रीडामंत्र्यांशी चर्चा केली आणि कुस्तीपटूंचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
आपल्या राज्यात ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धा यामध्ये जे खेळतात त्यांना केवळ सहा हजार रुपये आपण मानधन देतो. पण आता ते मानधन २० हजार करण्याचा निर्णय झाला आहे.
-
हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद यांना केवळ चार हजार रुपये मानधन आपण देतो, ते आता १५ हजार रुपये मानधन हे देण्याचा निर्णय आज जाहीर करूयात.
-
याचसोबत “अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्तीपटूंना त्यांना केवळ सहा हजार रुपये आपण देतो, त्यांनाही २० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय आपण करूया.
-
-
-
याचसोबत “अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्तीपटूंना त्यांना केवळ सहा हजार रुपये आपण देतो, त्यांनाही २० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय आपण करूया.
-
याशिवाय आमचे जे वयोवृद्ध खेळाडू आहेत, यांना केवळ अडीच हजार रुपये आपण देतो त्यांनाही साडेसात हजार रुपये म्हणजे तीनपट वाढून मानधन देण्याचा निर्णय झाला आहे.
-
म्हणजे जेवढे आपले खेळाडू आहे यांचं मानधन हे तीन पटीने किंवा त्याही पेक्षा अधिक वाढवण्याचा निर्णय आज या निमित्त आपण करतो आहोत.
-
या पाठीमागची भावना एवढीच आहे, की आमचे खेळाडू मेहनत करतात.
-
स्तीमध्ये मेहनतही लागते आणि खुराकही लागतो.
-
या दोन्ही गोष्टींसाठी मोठ्याप्रमाणात खर्च होतो. सामान्य कुटुंबातील खेळाडू मेहनतीने कुस्तीपटू होतात.
-
त्यामुळे त्यांना काहीना काही मदत ही सरकारच्यावतीने मिळाली पाहिजे, म्हणून आपण हा मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे.
-
एवढच नाही तर येत्या काळात जसं मागच्या काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरी आपण दिली. अशाचप्रकारे आमच्या खेळाडूंना विविध ठिकाणी नोकरी, संधी देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्यावतीने निश्चितपणे केलं जाईल. असंही फडणवीसांनी सांगितलं.
-
महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्यानंतर शिवराज राक्षे याने लोकसत्ता ऑनलाईनला प्रतिक्रिया दिली.
-
शिवराज म्हणाला, मी एका सामान्य घरातील मुलगा आहे. मला माझ्या वडिलांनी नेहमीच साथ दिली.
-
माझ्या वडिलांना मला ऑलम्पिकमध्ये लढताना बघायचंय आहे.
-
आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आजच्या स्पर्धेत क्षमतेने लढलो.
-
अंतिम सामना अपेक्षेपेक्षा फारच कमी वेळात संपल्याने कुस्ती चाहत्यांचा काहीसा हिरमोड झाला.
-
यंदा तब्बल ९०० पेक्षा जास्त कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
-
पुणेकर आणि राज्यभरातून आलेल्या कुस्तीप्रेमींनी कुस्तीपाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
-
महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात १९६१ पासून झाली असून, आतापर्यंत अनेक मल्लांनी या स्पर्धेतील मानाची गदा पटकावली आहे.
-
शिवराज विजयी झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी आणि मित्रांनी त्याला खांद्यावर उचलले होते.
-
शिवराजनेही चाहत्यांचे प्रेमाला हात वर करून प्रतिसाद दिला आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी तो निघाला.

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना