-
नुकतीच पुण्यात ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. शिवराज जिंकला त्याचे कौतुक होतच आहे. पण सेमी फायनलमध्ये महेंद्रकडून पराभूत झालेल्या सिकंदर शेखची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
-
सिकंदर शेखनं माजी महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखला चितपट करत खुल्या गटातून माती विभागातील फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
-
मातीवरची फायनल आणि महाराष्ट्र केसरीची सेमी फायनल कुस्ती महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखमध्ये झाली. सिकंदर शेख यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण महेंद्रला जास्त पॉईंट मिळाल्यामुळे सिकंदरचा पराभव झाला.
-
महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंतचा सिकंदरचा प्रवास हा अतिशय खडतर राहिला आहे. सिकंदरच्या कुस्ती निर्णयात न्यायी भुमिका घेतली गेली नाही. खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? ते गुण घाईने जाहिर करण्याचा प्रयत्न दिनेश गुंड यांनी का केला? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
-
सिकंदरवर खरंच अन्याय झाला का? याचे उत्तर कुस्तीमधील तज्ज्ञ मंडळी देतीलच. पण सिकंदरची संघर्षमय स्टोरी मात्र फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल झाली आहे.
-
घरात अठराविश्व दारिद्र आणि हमालाचा पोरगा ते कुस्तीपटू असा सिकंदरचा प्रवास राहिलेला आहे.
-
सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला असून त्याच्या घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा आहे. त्याचे वडीलही कुस्ती खेळायचे. पण गरिबीमुळे त्यांना हमालीचे काम करावे लागत होते.
-
आपल्या वडीलांच्या, भावाच्या पाठीवर असलेले हमालीचे ओझे कमी व्हावे, घरातले दारिद्र हटावे यासाठी रक्ताचे पाणी करणारा सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. सैन्यदलाकडून खेळत तो अनेक मैदाने जिंकत आहे. आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडीलांची इच्छा त्याने पुर्ण केली आहे.
-
आता पर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीएस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.
-
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड भिडले होते. ज्यामध्ये शिवराज राक्षेने चांदीची गदा जिंकली. उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, स्पर्धेचे आयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते गदा देऊन शिवराजचा सत्कार करण्यात आला.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती