-
नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमानाचा भीषण अपघात झाला.
-
या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे.
-
या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते.
-
एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते.
-
या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.
-
पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधी हे विमान अपघातग्रस्त झाले.
-
या विमानातील सर्वजण मृत पावल्याचं वृत्त समोर आलं आहे.
-
हे विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या सेती गंडकी नदीच्या काठावरील जंगलात कोसळलं.
-
विमान अपघातग्रस्त होताच विमानाला भीषण आग लागली.
-
या विमानात ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं होती.
-
अपघाताच्या वेळी विमानात ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण