-
जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध देशांचे प्रतिनिधी पुण्यात दाखल झाले.
-
भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिल यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले.
-
या परिषदेत गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.
-
दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणे, गुंतवणुकदारांसाठी अशा सुविधांचे पर्याय उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यक आर्थिक गुंतवणूक आणणे, या उद्देशाने जी २० सदस्य देश आणि इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप यांमध्ये या परिषदेत चर्चा झाली.
-
शहरांना आर्थिक विकासाची केंद्रे बनवणे, शहरी पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करणे, भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करणे, शहरी पायाभूत सुविधा निर्माण करणे, ऊर्जा सक्षम आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत पायाभूत सुविधांसाठी खासगी वित्तपुरवठा उघडण्यासाठी वित्तीय गुंतवणुकीचे निर्देश देणे आणि सामाजिक असंतुलन कमी करणे, अशा विविध पैलूंवर या निमित्ताने काम करण्यात आले.
-
या परिषदेला आंध्र प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छ्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील महापालिकांचे ३०० अधिकारीही या परिषदेत सहभागी झाले.
-
या परिषदेच्या निमित्ताने बैठका, चर्चा, विचारमंथन करण्यात आले.
-
तसेच वृक्षारोपण, सहभोजन, पुणे शहराचा हेरिटेज वॉक, महाबळेश्वर या नजिकच्या पर्यटन स्थळाला भेट, असा भरगच्च कार्यक्रम यानिमित्ताने आखण्यात आला होता.
-
या परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणाऱ्या कलांचे सादरीकरण करण्यात आले.
-
शिववंदना, मर्दानी खेळ, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, छक्कड, संकेतभाषा कला असलेली करपल्लवी यासह नरवीर तान्हाजी मालुसरे यांना समर्पित सादरीकरण करण्यात आले.
-
हेरिटेज वॉकच्या निमित्ताने परदेशी पाहुण्यांनी पुण्यातील पर्यटनस्थळांनाही भेट दिली
-
यामध्ये पाहुण्यांनी शनिवारवाडा, लाल महाल, दगडूशेठ हलवाई गणपती, नाना वाडा या स्थळांना भेट दिली
-
यावेळी पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली.
-
शनिवावाड्यावरही आकर्षक रोषणाई करण्यात आली. (सर्व फोटो- Arul Horizon)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार