-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले.
-
त्या अगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे या मेट्रोंचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
फोटो शेअर करताना फडणवीसांनी या मेट्रोंचा उल्लेख ‘मुंबईकरांच्या जीवनाचा नवीन साथीदार’ असा केला आहे.
-
लोकार्पणानंतर शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून मेट्रो २ अ आणि ७ मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे.
-
या मेट्रो मार्गिकेमुळे दहिसर ते अंधेरी प्रवास सुकर आणि अतिजलद होणार आहे.
-
ल्वे, बेस्टनंतर मेट्रोचे ही जाळे तयार होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
-
या मेट्रोमध्ये प्रवाशांसाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.
-
लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशनवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.
-
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या सोहळ्याच्या वेळी (एप्रिल २०२२) ज्या महिला मेट्रो पायलटने मेट्रोचे सारथ्य केले होते तीच महिला पायलट गुरुवारीही मेट्रोचे सारथ्य करणार आहे.

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी