-
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुंबईत आले.
-
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पंतप्रधान मोदींसमोर केलेल्या भाषणात शिवसेनेतील बंडखोरी, काही लोकांची बेईमानीपासून एकनाथ शिंदेंच्या हिमतीपर्यंत अनेक महत्त्वाची विधानं केली.
-
देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेतील बंडखोरी, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यावर नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळीकडेच लोकप्रिय आहेत. मात्र, लोकप्रियतेची काही स्पर्धा झाली, तर मोदींच्या लोकप्रियतेत मुंबई पहिल्या क्रमांकावर असेल. इतकं मुंबईकरांचं मोदींवर प्रेम आहे – देवेंद्र फडणवीस
-
२०१९ मध्ये मोदींनी मुंबईतच म्हटलं होतं की, पाच वर्षांच्या डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बदललं.तसेच पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार आणण्याचं आवाहन केलं – देवेंद्र फडणवीस
-
मोदींवर विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने डबल इंजिन सरकार निवडून दिलं – देवेंद्र फडणवीस
-
मात्र, काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही – देवेंद्र फडणवीस
-
मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंनी हिंमत केली आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं – देवेंद्र फडणवीस
-
यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने वेगाने धावू लागला – देवेंद्र फडणवीस
-
आज अनेक उद्घाटनं होणार आहे, त्यात पंतप्रधान स्वनिधी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे – देवेंद्र फडणवीस
-
करोना काळात पंतप्रधान मोदींनी टपरीवाल्यापासून हातगाडीवाल्यापर्यंत सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वनिधीची निर्मिती केली – देवेंद्र फडणवीस
-
मात्र, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्यात गरिबांना पैसे देणारी योजना महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला – देवेंद्र फडणवीस
-
असं असलं तरी आमचं पुन्हा सरकार आल्यावर आम्ही मुंबईतील एक लाख हातगाडी-टपरीधारकांना स्वनिधीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला – देवेंद्र फडणवीस
-
आज हा आकडा एक लाख १५ हजारपर्यंत पोहचला आहे – देवेंद्र फडणवीस
-
मोदी एकमेव पंतप्रधान असतील ज्यांनी ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटनही केलं – देवेंद्र फडणवीस
-
आज मेट्रोच्या ७ व २ लाईनच्या ३५ किलोमीटरचं उद्घाटन होत आहे – देवेंद्र फडणवीस
-
त्याचं भूमिपूजन मोदींनीच केलं होतं आणि आता उद्घाटनही तेच करत आहेत. ही नवी संस्कृती मोदींमुळे राज्यात आणि देशात निर्माण झाली आहे – देवेंद्र फडणवीस
-
मुंबईत कोट्यावधी लिटर प्रदुषित पाणी प्रक्रिया न करता रोज समुद्रात सोडलं जात होतं. त्यामुळेच समुद्र घाण होत होता – देवेंद्र फडणवीस
-
२०-२५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केले. स्वतःची घरं भरली – देवेंद्र फडणवीस
-
मात्र, एवढे वर्षे सत्तेत असूनही त्यांनी मुंबईकरांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही – देवेंद्र फडणवीस
-
मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मी बीएमसीला सांगितलं की, हे पाणी असं समुद्रात सोडता येणार नाही – देवेंद्र फडणवीस
-
मुंबईत उद्योगांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करावे लागतील, असं मी बीएमसीला सांगितलं – देवेंद्र फडणवीस
-
यानंतर बीएमसीने सांडपाणी प्रक्रियेबाबत नियम आणि निकषच नसल्याचं सांगितलं – देवेंद्र फडणवीस
-
याबाबत मी मोदी सरकारकडे याबाबत नियमावली तयार करण्याची विनंती केली. मोदी सरकारने एक वर्षात ती नियमावली तयार केली – देवेंद्र फडणवीस
-
नियम तयार केल्यानंतरही बीएमसीला तीन वर्षे सांडपाण्याबाबतच्या नियमांची अंमलबजावणी करता आली नाही. कारण सत्तेवर असणाऱ्या त्यांचा हिस्सा मिळत नव्हता – देवेंद्र फडणवीस
-
मात्र, आमचं सरकार आल्यावर आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात या कामाला गती दिली. आज त्याच प्रकल्पाची पायाभरणी मोदींच्या हस्ते होत आहे – देवेंद्र फडणवीस
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो सौजन्य – युट्यूब लाईव्ह)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल