-
राजधानी दिल्लीत नव्या इमारतीचे काम अतिशय वेगाने सुरु आहे. इमारतीचे सुशोभिकरण, इतर सजावट, बाग फुलविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
-
नवी संसद भवनाची इमारत जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत वापरण्यास तयार होईल, असे कळते आहे. जर वेळेत काम पूर्ण झाले तर यावर्षीचा अर्थसंकल्प नव्या संसदेत मांडला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
-
संसदेच्या जुन्या गोलाकार इमारतीसमोरच नव्या संसदेची त्रिकोणी आकारातील इमारत आहे. नव्या इमारतीमध्ये सेट्रंल हॉलची क्षमता एक हजार लोक बसतील, अशी करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहाचे संयुक्त बैठकीसाठी हा उत्तम पर्याय असेल.
-
नोव्हेंबर २०२२ मध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट पूर्ण होणार होता. मात्र काही कारणांमुळे त्याचे काम नियोजित वेळेच्या पुढे गेले.
-
डिसेंबर २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रोजेक्टचे भूमिपूजन केले होते. करोना काळात हजारो कोटी या प्रोजेक्टवर घालवत असल्यामुळे विरोधकांनी मोदींवर खूप टीका केली होती.
-
सेंट्रल व्हिस्टाच्या वेबसाईटवर नवे फोटो प्रसारीत करण्यात आले आहेत. ज्यामध्ये लोकसभेचे सभागृह अतिशय सुंदर असल्याचे दिसत आहे.
-
आगामी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टची इंत्थभूत माहिती सरकारकडून मिळेल.
-
नव्या संसदेच्या इमारतीत एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना आहे. उच्चस्तरीय बैठका, संसदेचे अधिवेशन आणि कॅबिनेट बैठका एकाच ठिकाणी होण्यासाठी यामुळे मदत होईल.
-
नव्या इमारतीमध्ये लोकसभेच्या बैठक व्यवस्थेचा फोटो समोर आलेला आहे. आकर्षक रोषणाई आणि सुटसुटीत अशी बैठकीची व्यवस्था आहे.
-
यामध्ये राज्यसभा सभागृहाचाही एक फोटो आहे. राज्यसभा हे वरिष्ठांचे सभागृह ओळखले जाते.
-
सध्याची संसदेची इमारत ही ९६ वर्ष जूनी आहे. १८ जानेवारी १९२७ रोजी तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड एरविन याने संसद भवनाचे उद्घाटन केले होते.
१९ वर्षीय भाचा मामीला घेऊन पळाला, संतापलेल्या मामाने मोठ्या बहिणीला संपवलं