-
बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या खूप चर्चेत आहेत.
-
त्यांच्या दरबारला (प्रवचन) अनेक राजकीय नेत्यांसह हजारो लोक गर्दी करतात.
-
अलिकडेच ते प्रवचनासाठी नागपूर येथे आले असता अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्या चमत्कारिक शक्तींना आव्हान दिले.
-
अंनिसने धीरेंद्र शास्त्री यांना त्यांच्या चमत्कारिक शक्ती जाहीरपणे सिद्ध करण्याचं आव्हान दिले आहे.
-
अन्यथा त्यांच्याविरुद्ध पोलीस एफआयआर दाखल करण्यात येईल, असेही समितीने म्हटले आहे.
-
धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवावा आणि ३० लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जावे, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव जाहीर केले आहे.
-
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म ४ जुलै १९९६ रोजी मध्य प्रदेशमधल्या छतरपूरजवळील गडागंज या गावात झाला.
-
शास्त्री यांचं कुटुंब गडगंजमध्ये राहते. तेथेच प्राचीन बागेश्वर धाम मंदिर आहे आणि त्यांचे वडिलोपार्जित घरदेखील आहे.
-
धीरेंद्र शास्त्री यांची दर महिन्याची कमाई जवळपास ३.५ लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येते.
-
शास्त्री एक कथा किंवा प्रवचन सांगण्यासाठी हजारो रुपये घेतात.
-
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची नेटवर्थ ९ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.
-
परंतु शास्त्री यांचं म्हणणं आहे की, ते या पैशांचा वापर भुकेल्या लोकांना अन्न देण्यासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी करतात.
-
धीरेंद्र कृष्ण शास्त्री एक गोशाळा देखील चालवतात.
-
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
त्यांच्यावर नागपुरात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे. (सर्व फोटो- फेसबूक- dhirendra krishna shastri)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”