-
निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे कागदी प्रकार आहेत. आपण कागदी वाघ नाही. पक्षप्रमुख हे जनतेने बहाल केलं आहे. शिवसेना ही धगधगती संघटना आहे. रक्तातून निर्माण झालेला शिवसेनेचा इतिहास आहे, तो कोणत्याही शाईने मिटवता येणार नाही, असं शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊतांनी सांगितलं.
-
“शिवसेनेचा इतिहास काय आहे, हे अनुभवायचं असेल तर मोदींची शिवसेना निर्माण झाली. त्यांनी महाराष्ट्राच्या सीमापार करुन पाहाव्यात,” असा टोला राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.
-
“हल्ली देवांच्या मूर्तीही चोरायला लागले आहेत. मात्र, देवाची मूर्ती चोरणारे मंदिर उभारत नाही. तर ते विकतात. हे चोर असून, दुर्लक्ष करा. ते आले तसे नष्ट होतील.”
-
“पावसाळ्यात गांडुळ येतात. त्यानंतर त्यांचं अस्तित्व संपते,” असा टोमणा शिंदे गटाला संजय राऊतांना लगावला आहे.
-
“संपूर्ण देशात शिवसेना म्हटलं की आजही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे समोर येतात. जो उत्साह आज दिसतोय हे शिवसेनेचं भविष्य आहे.”
-
“आपल्या तीन चाकी रिक्षाला प्रकाश आंबेडकरांचं चौथं चाक लागलं आहे,” असं संजय राऊतांनी म्हटलं.
-
“शिवसेनेने सातत्याने रक्त सांडलं आहे. शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना या देशात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही.”
-
“शिवसेनेला संपवण्याचं, मिटवण्याचं नष्ट करण्याचं कारस्थान सुरु आहे. त्या सर्वांना पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही.”
-
“ही शिवसेना ज्या उद्दात्त हेतूनं बाळासाहेबांनी उभी केली. तो पक्ष कोणालाही तोडता येणार नाही,” असेही संजय राऊतांनी बजावलं.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO