-
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली.
-
यानंतर प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (२३ जानेवारी) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या युतीवरील वक्तव्यापासून मोदींच्या राजकारणापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचा हा आढावा…
-
मी शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली आहे. ही प्रतिक्रिया नवीन नाही – प्रकाश आंबेडकर
-
आमच्या दोघांचं भांडण फार जुनं आहे – प्रकाश आंबेडकर
-
हे शेतातलं भांडण नाही, नेतृत्वातील भांडण आहे, दिशेचं भांडण आहे – प्रकाश आंबेडकर
-
ते आमच्याबरोबर येतील अशी आशा मी बाळगतो. कारण या लढ्याकडे मी वेगळ्या दृष्टीने बघतो – प्रकाश आंबेडकर
-
नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले आणि चंद्रशेखर गेले तेव्हा मी खासदार झालो – प्रकाश आंबेडकर
-
आम्ही पहिला आवाज तेव्हाचे टेलिकॉम मंत्री यांच्याविरोधात उठवला. १५ दिवसांनी सभागृह बंद केलं – प्रकाश आंबेडकर
-
नरसिंहराव आणि आमचे चांगले संबंध होते. त्यांनी महिनाभरानंतर बोलावून घेतलं आणि विचारलं की, तुम्ही काय केलं? – प्रकाश आंबेडकर
-
त्यावर आम्ही सभागृह बंद केलं, त्यानंतर तुम्ही पुढे काय केलं असं सांगण्याची मागणी केली – प्रकाश आंबेडकर
-
नरसिंहरावांनी संध्याकाळी आम्हाला पुन्हा बोलावून सांगितलं की, तुम्ही असंच केलं तर देशातील राजकीय नेतृत्व संपेल – प्रकाश आंबेडकर
-
आज दुर्दैवाने ईडीच्या माध्यमातून मोदी सरकार राजकीय नेतृत्व संपवण्याचं काम करत आहे – प्रकाश आंबेडकर
-
एखाद्या नेत्याने खरंच पैसे खाल्ले असेल तर त्याच्यावर जरूर कारवाई करा आणि न्यायालयात नेऊन तुरुंगात टाका – प्रकाश आंबेडकर
-
मात्र, न्यायालयात न्यायचं नाही, तुरुंगात टाकायचं नाही, केवळ नेतृत्वाचं प्रतिमाहनन करायचं काम सुरू आहे – प्रकाश आंबेडकर
-
कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही – प्रकाश आंबेडकर
-
एक दिवस प्रत्येकाचा अंत होणार आहे. तसाच एक दिवस नरेंद्र मोदींचाही अंत होणार आहे – प्रकाश आंबेडकर
-
या निमित्ताने निवडणुकांमध्ये एक बदलाचं राजकारण सुरू झालं आहे – प्रकाश आंबेडकर
-
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे – प्रकाश आंबेडकर (छायाचित्र – वंचित बहुजन आघाडी सोशल मीडिया)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”