-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ ठेऊनही त्यावर चर्चा होत नसल्यावर नाराजी व्यक्त केली.
-
यावेळी त्यांनी एवढे प्रयत्न करूनही लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? या प्रश्नावरही आपली भावना व्यक्त केली.
-
तसेच प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान आणि सलमान खानचं नाव घेत राजकीय टोलेबाजी केली.
-
ते मंगळवारी (२४ जानेवारी) ‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते.
-
राज ठाकरे यावेळी नेमकं काय बोलले त्याचा हा आढावा…
-
अपेक्षित मतदान झालं नाही की मला राग येत नाही, मात्र वाईट वाटतं- राज ठाकरे
-
वाईट या गोष्टीचं वाटतं की, एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही जर पदरात काही पडत नसेल तर वाईट वाटतं- राज ठाकरे
-
वाईट वाटतं कारण त्यामागे फार विचार असतो, मेहनत असते – राज ठाकरे
-
आमचं शाहरूख खान, सलमान खानसारखं नाही – राज ठाकरे
-
त्यांचा एक चित्रपट पडला तर लगेच दुसरा सुरू करू शकतात. मात्र, आमचं असं नाही – राज ठाकरे
-
आमचा एक चित्रपट संपला की लगेच सुरू करता येत नाही – राज ठाकरे
-
आमचा पाच वर्षांनीच सुरू होतो – राज ठाकरे
-
हे आमच्या हातात नसल्यामुळे पुन्हा ती पाच-पाच वर्षे जातात – राज ठाकरे
-
एक उमेदीचं वय असतं, उमेदीचा काळ असतो – राज ठाकरे
-
तुम्हाला या राज्यासाठी काही तरी नवीन करून दाखवावं वाटत असतं – राज ठाकरे
-
माझी ती इच्छा, आशा, आकांक्षा आहे. आमची सर्वांचीच आहे – राज ठाकरे
-
महाराष्ट्राने लवकरात लवकर ती गोष्ट हातात द्यावी – राज ठाकरे
-
सर्व छायाचित्र – संग्रहित

हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर