-
“राजकारण्यांकडून व्हिजन घेण्याऐवजी त्यांना व्हिजन देण्याची गरज आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली काय केलं करून ठेवलं ते कळत नाही. मुंबईत अनेक ठिकाणी खांबांवर लाईट लावून ठेवले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी मुंबई आहे की डान्सबार कळत नाही”, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर केली आहे.
-
एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
-
“मागील दहा वर्षांत अनेक मुख्यमंत्री झाले. बऱ्याच लोकांचे सरकार आले आणि गेले. मागील दहा वर्षांतील व्हिजनचे काय झाले, हे मला विचारायचे आहे. आता जे सत्तेत आहेत किंवा जे सत्तेत होते त्यांना माझ्या समोर आणा. मी त्यांना प्रश्न विचारतो”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
-
“महाराष्ट्राचा बकालपणा आणि चिखल झालेला आहे. सध्या राजकारणात बोलली जाणारी भाषा योग्य नाही. अभद्र आणि शिवराळ भाषेचा वापर करणाऱ्या नेत्यांना वृत्तवाहिन्यांनी स्थान देणे बंद करावे”, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
-
“मी राजकारणात येण्याअगोदर व्यंगचित्रकार होतो. जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून मी बघतो आहे की आपण त्याच त्याच समस्यांवर बोलत आहोत. पाण्याचा, रस्त्याचा, शाळेचा प्रश्न सोडवू असे सुरुवातीपासूनच आश्वासन दिले जात आहे. मग अजूनही तेच प्रश्न का आहेत. आपण सतत पैसा ओतत आहोत. शहरं वाढत आहेत. शहराला कसलाही आकार राहिलेला नाही. शिक्षणाचेही तेच हाल आहेत”, असेही राज ठाकरे म्हणाले.
-
“आपल्याला आपल्या गरजाच समजलेल्या नाहीत. आपण बेसुमार खर्च करत सुटलो आहोत. आपल्याला फक्त विकास दाखवायचा आहे. पूल बांधणे, मेट्रो आणणे याने प्रश्न सुटणार नाही”, असेही ते म्हणाले.
-
“आपण मूळ विषयाला हातच घालत नाहीत. सध्या ट्रॅफिकचा मुद्दा आहे. मग वाहनांवर बंदी कधी येणार. मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरांत एखादा अग्निशामक दलाचा बंबदेखील जाऊ शकत नाही. हा प्रश्न कसा सोडवायचा?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
-
“नुसती ऑटोमोबाईल इंडस्ट्री वाढत आहे. गाड्या विकल्या जात आहेत. पण त्या कुठे पार्क होत आहेत, याची आपल्याला माहिती नाही. गाड्या वाढत आहेत म्हणून आपण पूल, रस्ते बांधत आहोत. याने मूळ प्रश्न सुटणारच नाही”, अशी प्रतिक्रिायाही त्यांनी दिली.
-
“शहरांवर येणाऱ्या तणावाचा आपण विचार करणार आहोत की नाही. एका शहराची चार-चार शहरं होत चालली आहेत. कोण कोठे राहतोय समजत नाही. कोण कोठे जातो काहीही समजत नाही”, असेही ते म्हणाले.

बापरे! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स; अश्लील कृत्य करत सगळी मर्यादाच ओलांडली, धक्कादायक VIDEO व्हायरल