-
महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करून मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट माजी आयुक्त संजय पाडेंना दिलं होतं, असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
-
“मी काहीच केलं नव्हतं, ज्यामुळे ते जेलमध्ये टाकू शकतील. त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत.”
-
“मात्र, कोणत्याही परिस्थितीत मला अटक करा. जेलमध्ये टाका असे आदेश महाविकास आघाडी सरकारचे होते,” असं देवेंद्र फडणवीसांनी ‘एबीपी माझा’च्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं.
-
‘प्लॅन अ’ अजित पवार, ‘प्लॅन ब’ एकनाथ शिंदे, ‘प्लॅन क’ अशोक चव्हाण असणार का?, असं विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “२०२४ पर्यंतचे सर्व आश्चर्यांचे धक्के संपली आहेत.”
-
“आता २०२४ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी अनेक मोठे आश्चर्यांचे धक्के निश्चितपणे देऊ.”
-
“मात्र, आतातरी प्लॅन अ,ब,क काहीच नाही. सध्या आम्हाला चांगलं सरकार चालवायचं आहे.”
-
“महाराष्ट्रात अडीच वर्षात विकास थांबला होता. पण, आता आम्हाला महाराष्ट्र पुन्हा प्रगतिपथावर आणायचा आहे. हेच आमचं ध्येय आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
-
“उद्धव ठाकरेंबरोबर कोणतेही वैर नाही. त्यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी बंद केले. माझा फोनही उद्धव ठाकरेंनी घेतला नाही.”
-
“पाच वर्षे आपण ज्यांच्याबरोबर काम करतो, सरकार चालवतो. किमान फोन करुन तुमच्याबरोबर यायचं नाही, हे सांगायला हवं होतं. पण, तुम्ही ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी बंद केले. याचं मला दु:ख आहे,” अशी खंत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे. ( सर्व छायाचित्र सौजन्य – देवेंद्र फडणवीस फेसबूक )

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा