-
बागेश्वर धाम पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आणि अध्यात्मिक व्याख्यान देणाऱ्या जया किशोरी यांच्या लग्नाची अफवा सोशल मीडियावर उडाली होती. त्यानंतर एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी याबाबत खुलासा केला आहे.
-
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा मध्यंतरी नागपूर येथे एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक श्याम मानव यांनी त्यांना चमत्कार दाखविण्याचे आव्हान दिले. या आव्हानानंतर शास्त्री चांगलेच चर्चेत आले.
-
धीरेंद्र शास्त्री चर्चेत असतानाच अचानक त्यांच्या लग्नाची अफवा उडाल्यामुळे नेटीझन्सना आयता विषय मिळाला. सोशल मीडियावर या विषयाची खूप चर्चा झाली. मात्र धीरेंद्र शास्त्री या चर्चेवर नाराज झाले आहेत. अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
-
खरंतर आपल्या लग्नाबाबत बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, माझ्या लग्नाबाबत पसरलेली अफवा केवळ मिथ्या आहे. सध्यातरी लग्नाचा विचार माझ्या मनात नाही. पण जेव्हा केव्हा मी लग्न करेल, तेव्हा ते वाजतगाजत करेल.
-
धीरेंद्र शास्त्री यांना अविवाहित राहायचे नाही, असेही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. पुढे जाऊन माझ्या चरित्र्यावर संशय घेतला जाऊ नये, म्हणून मी लग्न करणार आहे. मात्र सध्यातरी याबाबत विचार केलेला नाही.
-
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म छत्रपूर जिल्ह्यात ४ जुलै १९९६ साली झाला आहे. त्यांच्या मूळ गावी बागेश्वर धाम आहे, जिथे त्यांचा दरबार भरतो. २७ वर्षीय धीरेंद्र शास्त्री म्हणतात माझ्या लग्नाबाबत माझे पालक निर्णय घेतील.
-
कथावाचक जया किशोरी या सोशल मीडियावर चागंल्याच प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ इन्टाग्राम आणि युट्यूबवर व्हायरल होत असतात. अध्यात्मिक कथा वाचणाऱ्या जया किशोरी तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.
-
जया किशोरी यांनी वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केलेली आहे. जया किशोरी धीरेंद्र शास्त्रीप्रमाणेच अविवाहित आहेत. त्यांचा जन्म राजस्थानमध्ये १३ जुलै १९९५ रोजी झाला होता. वयाच्या ९ व्या वर्षापासून त्यांनी अध्यात्मिक कथावाचन सुरु केले होते.
-
जया किशोरी यांना देखील त्यांच्या लग्नाबाबत अनेकदा प्रश्न विचारले जातात. त्यावेळी जया किशोरी आपल्या पालकांकडे बोट दाखवितात. मला माझ्या पालकांसोबतच आयुष्यभर राहायची इच्छा आहे. ते ठरवतील तेव्हाच लग्न करणार असल्याचेही त्या सांगतात.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”