-
भारतात दरवर्षी २६ जानेवारीला मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यंदा भारत आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.
-
करोनांतर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
-
यासाठी सर्व सरकारी कार्यालय आणि शाळा-महाविद्यायलये सज्ज झाली आहेत.
-
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना दिली आहे.
-
गेल्या तीन वर्षांपासून ही यशस्वी परंपरा सुरू असून यंदाही झील एज्युकेशन सोसायटीने अनोखा विक्रम केला आहे.
-
पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटी ही संस्था गेली २६ वर्षे शिक्षण क्षेत्रातील अग्रगणी संस्था आहे.
-
हा उपक्रम २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता संस्थेच्या प्रांगणात साकारला गेला.
-
या उपक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व दीपप्रज्वलनाने संस्थेचे सचिव डॉ. जयेश काटकर यांच्या हस्ते झाली.
-
या उपक्रमामध्ये संस्थेचे ३७०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
-
तर ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी गेल्या एक महिन्यापासून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
-
या कार्यक्रमाद्वारे एकता आणि शांततेचा संदेश देशातील युवा तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आलं.
-
या उपक्रमामध्ये देशात राष्ट्रध्वज, नेताजी सुभाष चंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची मानवी प्रतिकृती साकारून मानवंदना दिली गेली.

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”