-
शेतकरी कष्टकरी अशा गरिबांचा देव असणाऱ्या विठ्ठलाच्या खजिन्यामध्ये जालना येथील एका भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे दान दिले आहे.
-
वसंत पंचमीच्या पूर्वसंध्येला सोन्याचा मुकुट अर्पण केला. तसेच रुक्मणी मातेला बांगड्या मंगळसूत्र अशी आभूषण देखील अर्पित केली.
-
या दानामध्ये रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी अशी सोन्याची दागिने दान केली आहेत.
-
मागच्या ५० वर्षांतील हे सर्वात मोठे दान असल्याचे पंढरपूर मंदिर समितीचे व्यवस्थापक बालादी पुदवाड यांनी सांगितले.
-
हे सर्व दागिने पुणे येथील नगरकर सराफ यांच्याकडे घडवण्यात आले असल्याची माहिती आहे. अशा अमूल्य दागिन्यांमुळे विठ्ठलाच्या खजिनात मोठी भर पडली आहे.
-
आज वसंतपंचमीच्या मुहूर्तावर विठुराया आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा साजरा केला जात असतो. यानिमित्त देशभरातून लाभो भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात.
-
देवाच्या रोजच्या पुजाअर्चासाठी लागणारे चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवासाठी चांदीचा आरसा अशा वस्तू या दानामध्ये समाविष्ट आहेत.
-
विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी खास चेन्नई व बंगळुरु येथून रेशमाचे पांढरे वस्त्र आणण्यात आले आहेत.
-
पांढऱ्या रेशमी वस्त्रामध्ये विठुरायचे अतिशय मनमोहक, लोभस असे रुप पाहायला मिळत आहे.
-
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात भारतीय ध्वजाच्या रंगात फुलांची सजावट करण्यात आली आहे. अतिशय सुंदर अशी ही सजावट आहे.
-
विठुरायाच्या गाभाऱ्यातही प्रजासत्ताक दिनानिमित्त फुलांची आरास करण्यात आली आहे. भारतीय ध्वजाच्या रंगात मंदिराचा गांभारा अतिशय मनमोहक दिसत आहे.
-
रुक्मिणी मातेच्या मुर्तीलाही सजावट करण्यात आली आहे. आजच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विठुरायाचे भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे दाखल झाले आहेत.
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई