-
आज देशभरात ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. राजधानी दिल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदाही पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.
-
यावेळी सुरक्षा दलाकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रांचे प्रदर्शन आणि चित्तथरारक कसरती सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.
-
दिल्लीतील कर्तव्य पथावर आज तिन्ही सैन्य दलाच्या विविध तुकड्यांनी आपापलं कसब दाखवलं.
-
यावेळी कॅप्टन सुनील दशरथे यांच्या नेतृत्वाखालील ‘अमृतसर एअरफील्ड’ आणि ‘५१२ लाइट एडी मिसाइल रेजिमेंट’चे लेफ्टनंट चेतन शर्मा यांनी २७ एअर डिफेन्स मिसाइल रेजिमेंटची ‘आकाश’ या शस्त्र प्रणालीसह सादरीकरण केले.
-
लेफ्टनंट प्रज्ज्वल काला यांच्या नेतृत्वाखाली ८६१ क्षेपणास्त्र रेजिमेंटने ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रासह कर्तव्यपथावरील पथसंचलनात सहभाग घेतला.
-
आज झालेल्या पथसंचलनादरम्यान कर्तव्य पथावर K9-Vajra-T क्षेपणास्त्र प्रणालीचेही सादरीकरण सैन्य दलाकडून करण्यात आले.
-
३ लडाख स्काउट्स रेजिमेंटचे कॅप्टन नवीन धत्तेरवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘क्विक रिअॅक्शन फायटिंग व्हेईकल’च्या तुकडीनेही कर्तव्यपथावरून संचलन केले.
-
लेफ्टनंट सिद्धार्थ त्यागी यांच्या नेतृत्वाखाली १७ इन्फंट्री रेजिमेंटच्या ‘नाग’ क्षेपणास्त्र प्रणालीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
-
७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वायू दलाच्या विमानांनी केलेल्या चित्तथरारक सादरीकरणाने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.
-
यावेळी तीन मिग २९ मल्टीरोल फायटरचे ‘बाज फॉर्मेशन’ही अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
-
मिग २९ च्या ‘बाज फॉर्मेशन’ बरोबरच ‘६ जग्वार डीप पेनिट्रेशन स्ट्राइक एअरक्राफ्ट’च्या ‘अमृत फॉर्मेशन’नेही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला.
-
याबरोबरच चार ‘राफेल मल्टी रोल फायटर’ विमानांनीही यावेळी चित्तथरारक सादरीकरण केले.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स