-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (शनिवार) कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली. इंडिया टुडे – सी वोटरचा “मुड ऑफ द नेशन” हा सर्वे अतिशय महत्त्वाचा असल्याचे शरद पवार म्हणाले. ही जी एजन्सी आहे, त्यांची अचूकता ही यापूर्वी बरीच सिद्ध झाली. पण मी एकदम त्यामध्ये जाणार नाही. एक दिशा त्यांनी दाखवलेली आहे. ती दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची नाही असं दिसतं असल्याचेही ते म्हणाले.
-
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर यांच्यासोबतच्या युतीबाबातही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चाच झालेली नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्तावच आमच्यासमोर नसल्यामुळे निवडणूक एकत्र लढवायची की नाही, यावर चर्चाच होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
-
कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, कोल्हापूर, नांदेड, पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती का? त्यावेळी भाजपा नेते चंद्रकांत पाटलांना काही आठवलेलं दिसत नाही. त्यांना आताच बिनविरोधचं का सुचतंय कुणास ठाऊक? अशी टीका पवार यांनी केली.
-
लोकसभा-विधानसभा एकत्र होतील का? या प्रश्नावर पवार म्हणाले की, काही सांगता येत नाही काय होईल ते. काही लोक म्हणत आहेत, एकत्र होतील म्हणून. पण याची पक्की माहिती माझ्याकडे नाही.
-
मुंब्र्यांमध्ये नगरसेवकांना एक कोटीचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावर बोलत असताना पवार म्हणाले की, अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना मूळ पक्षातून फोडून अन्य ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिंदे गटाकडून यासंबंधीची पावले अधिक दिसतात. निवडणूक जवळ येताच, या गोष्टी होत असतात. पण त्याची फार चिंता करायची नसते.
-
लव्ह जिहाद आणि हिंदू जनजागर आक्रोष मोर्चे निघत असल्याबाबत पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, या प्रकरणांमागे विशिष्ट विचारधारा काम करत आहे. या विचारधारा समाजात जातीय तेढ कशी वाढेल? याचा प्रयत्न करत आहे.
-
महाराष्ट्राचे राज्यपाल बदलणार आणि कॅप्टन अमरिंदर सिंह राज्यपाल म्हणून येणार अशी चर्चा आम्ही देखील ऐकून आहोत. आताचे राज्यपाल यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली, याचाच एकप्रकारचा आनंदच आम्हा सर्वांना आहे, अशा शब्दात पवार यांनी राज्यपालाच्या जाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
-
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लोकांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. सामान्य माणसाचे सहकार्य आणि पाठिंबा यात्रेला मिळालेला आहे. लोक याकडे गांभीर्याने पाहत आहेत.
-
विरोधकांची मोट बांधण्यासाठी आपल्यासह अनेक ज्येष्ठ मंडळी काम करत आहेत, त्याची सध्या काय स्थिती आहे? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीकडून विचारण्यात आल्यावर शरद पवार म्हणालेय “यामध्ये अद्याप काही सकारात्मक सांगण्यासारखं काही नाही. मी स्वत: अनेकांशी बोलतो आहे. अनेकांना एकत्र आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
-
BBC documentary बाबत बोलताना पवार म्हणाले की, एखाद्या फिल्मवर बंदी घालणे लोकशाहीच्या विरोधी आहे. एखाद्याला फिल्म बघायची असेल तर तो त्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. अ, ब, क लोकांना ती फिल्म आवडत नसल्यामुळे तिचे प्रदर्शनच रोखायचे, हे काही ठिक नाही. हे सगळं लोकाशाहीच्या विरोधात चालले आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख