-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर येथे समारोप करण्यात आला.
-
यानिमित्त श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत अन्य विरोधीपक्षातील नेतेही सहभागी झाले होते.
-
यावेळी काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी श्रीनगरमधील काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहन देखील करण्यात आलं.
-
यादरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या बहिणी-भावाच्या नात्यातील अतूट प्रेम देखील दिसून आलं.
-
यावेळी राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी सामान्यांप्रमाणे बर्फ खेळण्याचा आनंद घेतला.
-
राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्वीटर खात्यावर हा व्हिडीओ शेअर करत जम्मू-काश्मीरच्या लोकांना बर्फवृष्टीच्या शुभेच्छा दिल्या.
-
दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच बर्फवृष्टी होत असताना त्यांनी हे भाषण केलं.
-
”मी हिंसा पाहिली आहे, सहन केली आहे. ज्याने हे पाहिलेलं नाही त्यांना हे कळणार नाही. मोदी, अमित शाह, आरएसएसचे लोक यांनी हिंसा पाहिलेली नाही. ते घाबरतात”, असे ते म्हणाले.
-
”मी चार दिवस पायी चाललो, मात्र मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भाजपाचा एकही नेता अशा प्रकारे चालू शकत नाही. कारण त्यांना भीती वाटते”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
-
”मला या भारत जोडो यात्रेने खूप काही शिकवलं आहे. अनेकदा मला वेदना व्हायच्या पण मी त्या सहन करायचो”, असेही ते म्हणाले.
-
७ सप्टेंबर रोजी सुरू झालेली भारत जोडो यात्रा ३ हजार ५७० किलोमीटरचा प्रवास करत जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाली होती.
-
दरम्यान या यात्रेने १५० दिवसात १२ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून प्रवास केला. राहुल गांधींच्या दोन दशकांच्या राजकीय कारकीर्दीतील ही सर्वात मोठी पदयात्रा होती.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती