-
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा मुलगा हरीश नड्डा याच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये देशातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली.
-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रिसेप्शनला हजेरी लावून वधू-वरांस आशीर्वाद दिले.
-
भाजपासहीत सर्वच मोठ्या राजकीय पक्षांचे नेते या लग्नसोहळ्याच्या रिसेप्शनमध्ये उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
-
भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील रिसेप्शनला उपस्थिती दर्शविली होती.
-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या विवाह सोहळ्याच्या रिसेप्शनसाठी हिमाचल प्रदेश येथे गेले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते.
-
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक भाजपाचे नेते देखील यावेळी दिसले.
-
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सहपरिवार या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावून वधू वरांना शुभेच्छा दिल्या.
-
राजकारण्यांच्या या भाऊगर्दीत काही पत्रकार देखील लग्नाला उपस्थित होते.
-
हिमाचल प्रदेशमधील बिलासपुरी धाम पद्धतीने संपन्न झालेल्या या रिसेप्शन सोहळ्याला हिमाचली आणि हरियाणवी पारंपरिक वाद्यांचे सुरेल संगीत ऐकायला मिळाले.
-
माजी लष्करप्रमुख व्हि. के. सिंह देखील यावेळी रिसेप्शनला दिसले. हिमाचल प्रदेशमधील भाजपाचे नेते तसेच मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील उपस्थित होते.
-
भाजपाचे विरोधक आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची देखील या रिसेप्शनला उपस्थिती होती. देशभरातील अनेक भाजपाविरोधी पक्षाच्या नेत्यांनी वाद विसरुन मुक्तपणे वधू-वरांस शुभेच्छा दिल्या.
-
जेपी नड्डा यांच्या मुलाचे लग्न २५ जानेवारी रोजी संपन्न झाले होते. जयपूरमधील हॉटेल व्यावसायिक रमाकांत शर्मा यांची मुलगी रिद्धी सोबत ते विवाहबद्ध झाले. त्यांचा रिसेप्शन सोहळा ५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”