-
ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शिंदे गटात येण्याची ऑफर देण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांना कोणत्या कोणत्या पक्षांची ऑफर होती, याबद्दल सांगत पक्षनिष्ठेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
-
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “स्वर्गीय आनंद दिघे यांचं निधन झाल्यानंतर रघुनाथ मोरे हे जिल्हाप्रमुख झाले होते. त्यांचाही अपघात झाला. त्याच काळात आमच्या संघर्ष संस्थेच्या कार्यालयात देवीदास चाळके बसले होते.”
-
“तेव्हा फोन आला आणि मिलिंद नार्वेकरांमार्फत उद्धव ठाकरेंनी ठाणे जिल्हाप्रमुख पदाची ऑफर दिली होती.”
-
“तसेच, विचार करून सांग असं मिलिंद नार्वेकरांनी म्हटलं होतं. पण, मिलिंद नार्वेकर मित्र असल्याने त्यांना सांगितलं, की विचार करण्यासारखं काहीचं नाही.”
-
“मी शरद पवारांना सोडणार नाही,” असं सांगितल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
-
“एके दिवशी गोपीनाथ मुंडेंचा फोन आला. त्यांनी म्हटलं, मी आणि प्रमोद महाजन यांनी चर्चा केली; तुला भाजपातर्फे आमदार करायचं आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंशीही बोलणार आहे.”
-
“पण तू घरी चर्चा करुन मला कळव. त्यानंतर पत्नीशी चर्चा केली. पत्नीला सांगितलं की, तूच त्यांना सांग मी शरद पवारांना सोडणार नाही. त्याला काही मिळालं, नाही मिळालं तरी चालेल.”
-
“हे पत्नीने कळवल्यानंतरही गोपीनाथ मुंडेंनी कधीच माझ्यावर माझ्यावर राग ठेवला नाही,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
-
“शरद पवारांनी २०१४ आणि २०१९ साली मंत्री केलं. जेव्हा जेव्हा राजकीय संकट आलं, तेव्हा माझ्यामागे शरद पवार उभे राहिले,” असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश