-
नाशिक येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी ‘महाविजय २०२४’ या संकल्पाची घोषणा केली. या संकल्पातंर्गत लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक तर विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपकडून समोर ठेवण्यात आले आहे.
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१४ नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली आणि पत्रकारांना सुद्धा आपल्याला जिंकताना पाहण्याची सवय लागली. पण एक सुद्धा पराभव झाला तर, हा आत्मचिंतन करण्याचा विषय आहे. अमरावतीमध्ये तीन हजार मतांनी पराभूत झालो, पण सहा हजार आपली असलेली मते बाद झाली, यावर चिंतन करावेच लागेल.
-
योगायोगाने आज पंडित दिनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी आहे. भाजपाच्यावतीने हा दिवस समर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्श करत असताना फडणवीस म्हणाले की, कार्यकर्त्यांना देखील समर्पण करावे लागेल. चुकीच्या इच्छाशक्ती, अनियंत्रित महत्त्वकांक्षा आणि अहंकाराचा त्याग करावा लागेल.
-
‘विशेष परिस्थिती’मध्ये आपलं सरकार तयार झाले आहे. मला काय मिळणार? याचा विचार पुढच्या विधानसभेर्यंत सोडून द्या. पुढच्या विधानसभेपर्यंत या सत्तेतून मी काय मिळवतो, हा विचार सोडा. आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. अडीच वर्षाच्या काळात योग्य प्रकारची सेवा करुन लोकांचा विश्वास कमावला. तर त्यापुढे वर्षानुवर्ष जनता आपल्याला सत्तेत ठेवणार आहे, असेही ते म्हणाले.
-
म्हणून मी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे मी समर्पण मागत आहे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. हे कार्यकर्त्यांनी समर्पण आणि वेळ दिला तरच आपण ‘महाविजय २०२४’ हा संकल्प पूर्ण करु शकू.
-
देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतील भाषणांमधून एकप्रकारे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
-
शिंदे – फडणवीस सरकार राज्यात स्थापन होऊन सात ते आठ महिन्यांचा काळ लोटला, तरिही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि इच्छुकांची भली मोठी संख्या त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार वेळोवेळी लांबणीवर पडलेला आहे.
-
त्यासबोतच सत्ता आल्यापासून विविध महामंडळांवरही कुणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीने देखील सत्ता असताना महिला आयोग वगळता एकाही महामंडळावर किंवा आस्थापनेवर पदाधिकारी कार्यकर्त्यांची वर्णी लावली नव्हती. त्यामुळे मविआचाच कित्ता शिंदे-फडणवीस सरकार देखील गिरवणार का? याकडे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
-
मंत्रिपद किंवा सत्तेतील वाट्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात धुसफूस निर्माण होऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आतापासूनच मिशन २०२४ ची घोषणा करुन पदाधिकाऱ्यांच्या इच्छेला समर्पण वृत्तीची जोड दिली असल्याचे दिसते.

ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल