-
भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून असलेली कारकीर्द ही प्रचंड वादग्रस्त ठरली. मग तो पहाटेचा शपथविधी असो किंवा शिवरायांविषयीचं वक्तव्य, त्यांनी पदावरून पायउतार होण्याचीही मागणी केली होती. त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे.
-
२३ नोव्हेंबर २०१९ हा तो दिवस होता ज्यादिवशी अर्ध्या रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवत राज्यपाल कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली होती. या शपथविधीची चर्चा आजही होते
-
यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं त्यावेळी शपथविधी सोहळ्यात कोश्यारी यांनी
-
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे नेते के.सी. पडवी हे मंत्री म्हणून शपथ घेत होते. त्यावेळी त्यांनी शपथ घेताना काही ओळी आपल्या मनाने जोडल्या. यावरून राज्यपाल भगत सिंह हे पडवी यांच्यावर चिडले होते. मी सांगतो आहे त्याच भाषेत आणि तेवढीच शपथ घ्यायची आहे.
-
कोरोना असल्याने राज्यसह देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता.त्यावेळीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना पत्र लिहून हिंदुत्वाची आठवण केली होती. राज्यपाल विरूद्ध सरकार हा वाद तेव्हाही रंगला होता.
-
गुरुची महती पटवून देण्याच्या नादात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल आणि समर्थ रामदारांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण विचारेल असं ते म्हणाले होते. तसंच नोव्हेंबर महिन्यात त्यांनी छत्रपती शिवराय हे जुन्या काळातले आदर्श आहेत असं विधान केलं होतं, त्यानंतर बराच वाद झाला होता.
-
राज्यात शेतकरी आंदोलन सुरू होतं त्यावेळी शरद पवार यांना भेट दिली नाही . मात्र कंगना रणौतला ते भेटले होते त्यावेळीही वाद झाला होता. शरद पवार यांनीही यावरून टीका केली.
-
काही दिवसांपूर्वीच भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं आणि पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरूनही टीका झाली त्यांनी हे पत्र राष्ट्रपतींना का लिहिलं नाही? असा प्रश्न विचारला गेला. कोश्यारी महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आले तेव्हापासून सुरू झालेली वादांची मालिका त्यांच्या राजीनाम्यानंतर संपली आहे.

