-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या ‘पहाटेच्या शपथे’वर महत्त्वाचे भाष्य केले आहे.
-
उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे- देवेंद्र फडणवीस
-
त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे.- देवेंद्र फडणवीस
-
अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. – देवेंद्र फडणवीस
-
प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, ठरल्यानंतर कसं तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील- देवेंद्र फडणवीस
-
फडणवीसांनी केलेल्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
-
फडणवीसांनी हे विधान केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील, वाटलं नव्हतं, असे शरद पवार म्हणाले आहेत.
-
तसेच काँग्रेसचे नेत अशोक चव्हाण यांनीदेखील फडणवीस यांनी केलेल्या विधनावर प्रतिक्रिया दिली आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांना हा साक्षात्कार निवडणुकीच्याच तोंडावर कसा होता, हा प्रश्न आमच्यासमोर आहे.- अशोक चव्हाण
-
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते मुरब्बी राजकारणी आहेत. शरद पवार असे कधीही करणार नाहीत.- अशोक चव्हाण
-
ते जी भूमिका घेतात ती खुलेआम घेतात. लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही.- अशोक चव्हाण
-
निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करणे हाच फडणवीसांच्या विधानाचा हेतू आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
-
दरम्यान देवेंद्र फडणीसांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
-
फडणवीसांच्या या विधानावर आता अजित पवार काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य