-
शिवसेनेतील सत्तासंघर्षावर मागील तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. पाच सदस्यीय खंडपीठाच्या न्यायाधीशांसमोर ही सुनावणी सुरु असून, ठाकरे आणि शिंदे गटाच्या वतीने जोरदार युक्तीवाद करण्यात आला आहे.
-
आजच्या ( १६ फेब्रुवारी ) सुनावणीत शिवसेनेचे ( ठाकरे गट ) वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तीवादाने सर्वाचं लक्ष वेधलं.
-
कपिल सिब्बल यांनी गुवाहाटी दौरा, १० वी अधिसूची, व्हिपचं उल्लंघन, विधानसभा उपाध्यक्ष अविश्वास ठराव आणि विविध मुद्द्यांवर युक्तीवाद केला.
-
कपिल सिब्बल यांनी सांगितलं की, “लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आलं.”
-
“गुवाहाटीत बसून महाराष्ट्राच्या सरकारबाबत निर्णय घेतला जाऊ शकत नाही. जगातील कोणत्याही लोकशाहीत हे स्वीकारलं जाऊ शकत नाही.”
-
“गुवाहाटीत बसून विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस काढण्यात आली. पण, ती फक्त नोटीस होती, अविश्वास प्रस्ताव नव्हता.”
-
“अविश्वास प्रस्तावासाठी प्रक्रिया पाळावी लागते. विधानसभेचे नियम लोकसभेपेक्षा वेगळे आहेत,” असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.
-
शिंदे गटाच्या कृतीवर बोट ठेवत सिब्बल म्हणाले की, “ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं. शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपाला मतदान केलं.”
-
“दहाव्या सूचीचा वापर सरकार पाडण्यासाठी होऊ नये. दहाव्या सूचीत बहुमताला महत्व असा काही नियम नाही. तुम्ही ३४ असले तरी विलिनीकरण हाच पर्याय आहे.”
-
“आमदार विलीन झाले तरी मूळ पक्ष तसाच राहतो,” असेही कपिल सिब्बल यांनी सांगितलं.
-
“कायदेशीर पद्धतीने निवडून आलेलं सरकार पाडलं जात आहे. असं करुन तुम्ही विषारी झाडाची फळं चाखायला देत आहात.”
-
“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, आता ते कसं माघारी घेता येणार?,” असा सडेतोड युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख