-
पुणे : एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात शिंदे-ठाकरे गट शनिवारी आमनेसामने आले.
-
दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची समजूत घालून परिस्थिती आटोक्यात आणली.
-
मात्र, नवी पेठेतील गांजवे चौक परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
-
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिले आहे.
-
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांचे कार्यकर्ते आमनेसामने येत आहेत.
-
पुण्यात एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते शनिवारी एकत्र आले होते.
-
उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
-
मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली.
-
त्यामुळे नवी पेठेतील गांजवे चौक परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
-
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली.
-
दरम्यान, यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ