-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुलुंड येथील व्हीजेटीआय महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
-
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली.
-
आज जातीपातीमुळे विचका झाला आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, तो महाराष्ट्र जातीपातींमध्ये खितपत पडता कामा नये. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी नीट लक्षात ठेवावी. तुम्ही जातीपातीत अडकू नये, असा सल्ला राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांना दिला.
-
पूर्वी इतिहासात ‘इंच-इंच लढू’ असा वाक्यप्रचार होत होता. मात्र, आताचं ते ‘इंच-इंच विकू’ असं झालं आहे. जे दिसेल ते विकायचं आणि त्यातून पैसे कमावायचे, सरकारी गोष्टी खासगी लोकांच्या घशात घालायच्या एवढा उद्योग सध्या देशात सुरू आहे, असेही ते म्हणाले.
-
आपल्याकडील मुलं परदेशात फक्त शिक्षणासाठी जात नाहीत. तर भोवतालचं वातावरण बघून जातात, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
-
विद्यार्थ्यांनी त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा वारसा कसा आत्मसात केला? असा प्रश्न विचारला.
-
या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, “तुम्हाला मी काय सांगू. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु मी जे बोलतोय ते सत्य आहे. मी भाषणाला जेव्हा केव्हा उभा राहतो किंवा ज्या दिवशी मला भाषण द्यायचं असतं त्यासारखा वाईट दिवस माझा कुठलाच जात नाही. माझ्या पूर्ण हाताला मुंग्या आलेल्या असतात. हातपाय थंड पडतात, हातापायाला घाम फुटलेला असतो.”
-
पुढे बोलताना माझ्या भाषणाच्या पद्धतीला फॉलो करू नका, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. “माझ्या कुलदैवतांची, घरच्यांची कृपा असेल, पण मला ठरवून भाषण करता येत नाही आणि मी केलंही नाही. त्यामुळे माझ्या भाषणाच्या पद्धतीला फॉलो करू नका, असे ते म्हणाले.
-
मला जे मनातनं वाटतं ते मी बोलत जातो. मला वाटते ती गोष्ट मी सांगतो,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.
-
दरम्यान, एका विद्यार्थ्याने उच्च शिक्षणाबाबत तुमच्या संकल्पना काय? असा प्रश्न विचारताच त्यांनी मिश्किल मिश्कील प्रतिक्रिया दिली.
-
आताचं सरकार आणि यापूर्वीच सरकारांपासून मला याचं उत्तर मिळालेलं नाही. आता काही निवडणुका नाहीत. पण तरीही एवढच सांगेन, की या प्रश्नाचं उत्तर तुझ्या समोर उभं आहे, अशी मिश्कील प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
-
राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल