-
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस हे याआधी छत्तीसगड राज्याचे राज्यपाल होते.
-
त्याआधी त्यांनी मध्यप्रदेशचे राज्यपाल म्हणूनही काम केलं.
-
त्यांना संसदीय राजकारण, समाजकारण आणि संघटनात्मक कामाचा पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव आहे.
-
रमेश बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवकपदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपालपदापर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
-
रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथे झाला.
-
त्यांचे शिक्षण रायपूर येथेच झाले.
-
१९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
-
१९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते.
-
याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे आणि त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले.
-
१९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्रीदेखील होते.
-
१९८९ मध्ये रमेश बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले.
-
त्यानंतर तब्बल सहा वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. म्हणजेच रमेस बैस एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून गेले.
-
१९९८ मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.
-
१९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.
-
२००३ मध्ये बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला. त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.
-
आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिले.
-
२००९ ते २०१४ या काळात रमेश बैस हे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. २०१४ ते २०१९ या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
-
बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात अभ्यास आणि संशोधन केले.
-
२०१९ मध्ये बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.
-
राज्यपाल बैस यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिरे, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.
-
बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे.
-
आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे.
-
लालकृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळेच २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले, असे त्यांचे समर्थक म्हणतात.
-
लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतच सुषमा स्वराज यांच्यासोबतही त्यांचे संबंध चांगले होते. सुषमा स्वराज या रमेश बैस यांना आपला बंधू मानत होत्या. (सर्व छायाचित्र – संग्रहित)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO