-
मुंबईची दुसरी लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या ताफ्यात इलेक्ट्रीक डबल डेकर बसचा समावेश करण्यात आला होता. आजपासून मुंबईकरांच्या सेवेत या डबल डेकर बस दाखल झाल्या आहेत.
-
बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर बस जुन्या झाल्याने नव्या बसच्या पर्यायांवर विचार सुरू करण्यात आला होता. त्यानंतर आता एसी डबलडेकर बसचा समावेश बेस्टने आपल्या ताफ्यात केला आहे. ही बस जागतिक दर्जाची असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘स्विच मोबिलिटी’ कडून ९०० इलेक्ट्रीक बसेस वेट लीज तत्वावर बेस्ट घेणार आहेत.
-
आजपासून सीएसएमटीहून सकाळी पावणे नऊला पहिली बस सुरु झाली. नरिमन पॉईंटच्या एनसीपीएपर्यंतच्या रुटवर ही बस चालणार आहे. शनिवार, रविवार डबलडेकर बसमधून हेरिटेज टूर करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह, चर्चगेट, फोर्ट, कुलाबा या परिसरात पर्यटकांना एक छान फेरफटका मारता येईल.
-
वातुनूकुलीत सेवेसोबतच या बसमध्ये डिजिटल टॅप इन – टॅप आऊट तिकीट बुकिंगची व्यवस्था दिली आहे. जे लोक बेस्टचे चलो कार्ड किंवा चलो अॅप वापरतात. त्यांना कंडक्टरशिवाय स्वतःहूनच तिकीट काढता येणार आहे. तसेच सुट्ट्या पैशांची कटकटही नाही.
-
एसी डबल डेकर बसमध्ये ६५ प्रवाशांसाठी आसन क्षमता आहे. दोन्ही बाजूला दरवाजे असल्यामुळे जुन्या डबल डेकर बसमध्ये एकाच दरवाजात जी गर्दी व्हायची ती यात होणार नाही.
-
महत्त्वाचं म्हणजे या बसमध्ये सीसीटीव्ही देखील बसविण्यात आला आहे. त्यामुळे बसमध्ये एखादी वस्तू चुकून गहाळ झाल्यास किंवा चोरी झाल्यास त्याचा थांगपत्ता लागू शकतो.
-
एवढ्या सगळ्या सुविधा असूनही या बसचे तिकीट मात्र पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे पहिलाय पाच किमींसाठी फक्त ६ रुपये एवढंच आहे. सध्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसमध्ये जो तिकीट दर आहे, तोच दर डबलडेकरसाठी ठेवण्यात आला आहे.
-
बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी सांगितले की, आगामी आर्थिक वर्षात मुंबईत ४ हजार इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे नियोजन आहे. ज्यामध्ये २०० एसी डबल डेकर बस असणार आहेत.
-
एसी डबल डेकर बसचा सर्वाधिक फायदा म्हणजे जास्त प्रवासी वाहून नेता येतील. त्यासोबतच २०० डबल डेकर बसेस मिळून प्रतिवर्षी २६ दशलक्ष लिटर इंधनाची बचत करणार आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यात या बसेसचा मोठा हातभार असेल.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”