-
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला.
-
यावेळी सिब्बल यांनी पक्ष आणि विधिमंडळ पक्षातील फरकापासून शिवसेना पक्षाबाबतच्या निर्णयाचे सर्वाधिकार कोणाला देण्यात आले आणि उद्धव ठाकरेंचा राजीनामा असे अनेक मुद्दे मांडले.
-
या सुनावणीत कपिल सिब्बल नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…
-
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील कागदपत्रं पाहावेत. यात पहिलं कागदपत्र २७ फेब्रुवारी २०१८ चं आहे. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते, केवळ पक्षाचे अध्यक्ष होते – अॅड. कपिल सिब्बल
-
शिवसेनेचे काही नेते राष्ट्रीय कार्यकारणीवर निवडून आले आहेत, तर काहींची नियुक्ती करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर नव्हते, ते केवळ पक्षाचे अध्यक्ष होते – कपिल सिब्बल
-
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली. शिंदेची २०१८ ला पक्षनेतेपदी नियुक्ती झाली. आधीच्या कार्यकारिणीत शिंदे चौथ्या क्रमांकाचे नेते होते – कपिल सिब्बल
-
२१ जूनची बैठक विधिमंडळ पक्षाची बैठक, राजकीय पक्षाची नाही, बैठकीत गटनेता म्हणून अजय चौधरींची नेमणूक, तसेच सुनील प्रभू यांची प्रतोदपदी नियुक्ती – कपिल सिब्बल
-
प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं. त्यात म्हटलं की, शिंदेंनी शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या लेटरहेडचा गैरवापर केला- कपिल सिब्बल
-
शिवसेनेच्या ४५ आमदारांची बैठकीत शिंदेंना ‘चिफ व्हिप’ पदावरून काढण्यात आलं. तुम्हाला पदावरून काढल्याने मला कोणतीही नोटीस पाठवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ही कायदेशीर नोटीस माझ्यावर लागू होत नाही – कपिल सिब्बल
-
एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहिले नाही, त्यांनी २२ जूनचं पत्र लिहिलं, त्यांनी चुकीच्या पद्धतीने चिफ व्हिपची नियुक्ती केली. हे सर्व बेकायदेशीर आहे – कपिल सिब्बल
-
आसाममध्ये बसलेल्या ४० आमदारांनी स्वतःच स्वतःला पक्ष म्हणून जाहीर केलं. तसेच उर्वरित सर्वांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला – कपिल सिब्बल
-
आमदारांनी विरोधात मतदान केलं किंवा ते मतदानाच्यावेळी हजर राहिले नाही, तर ते पक्षाच्या विरोधात असेल. ‘चिफ व्हिप’ हा पक्षाने अधिकार दिलेला व्यक्ती असतो. अशाच प्रकारे राजकीय पक्ष काम करतात – कपिल सिब्बल
-
व्हिपबाबत पक्ष दिशानिर्देश करतो, व्यक्तिगत हा निर्णय घेता येत नाही. यानुसारच आमदारांनी कुणाला मतदान करायचं हे ठरवलं जातं – कपिल सिब्बल
-
विधिमंडळातील पक्षाला स्वतंत्रपणाने काम करण्याचे अधिकार मिळाले तर हे लोकशाहीसाठी आणि देशासाठी मोठं संकट असेल. असं झालं तर लोकनियुक्त सरकार गणितीय आकडेमोड करून केव्हाही पाडलं जाऊ शकतं – कपिल सिब्बल
-
विधिमंडळात कोणत्याही विधेयकावर मतदान करायचं असेल तर कुणाला मतदान करायचं हे केवळ विधिमंडळ पक्ष ठरवू शकत नाही. नैसर्गिकपणे असा निर्णय घेताना पक्षाशी चर्चा करावी लागते- कपिल सिब्बल
-
कारण आमदार विधिमंडळात स्वतंत्र व्यक्ती म्हणून काम करत नसतात, तर ते विधिमंडळात पक्षाचा आवाज म्हणून काम करत असतात – कपिल सिब्बल
-
उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असल्याचं पक्षाने निवडणूक आयोगाला कळवलं होतं – कपिल सिब्बल
-
तुम्हाला वकिली करायची असेल, तर वकिली करा; तुम्हाला संसदेत जायचं असेल, तर संसदेसाठी तुमचा वेळ द्या – – कपिल सिब्बल
-
आपण एका वेळी एकच काम करू शकतो, एकावेळी दोन काम केली जाऊ शकत नाही – कपिल सिब्बल
-
पक्षाबाबत महत्त्वाचे विषय न्यायालयासमोर आहेत आणि शिंदे गटाचे वकील इथं असावेत असं आम्हाला वाटतं, यामुळे दबाव वाढेल याची जेठमलानी यांना हळूहळू जाणीव होईल – कपिल सिब्बल
-
एकनाथ शिंदे राज्यपालांकडे कोणत्या अधिकारात गेले? – कपिल सिब्बल
-
राज्यपालांनी शिंदेंना शपथ द्यायला नको होती, घटनेने राज्यपालांना काही अधिकार दिले आहेत, तसेच तीन अटीही घातल्या आहेत – कपिल सिब्बल
-
अपात्रतेच्या नोटीसवर राज्यपालांनी उत्तर का मागितलं नाही? – कपिल सिब्बल
-
बहुमत चाचणीला आमचा आक्षेप आहे. पुरेसा वेळ न दिल्यानेच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला – कपिल सिब्बल
-
आयोगाने केवळ विधिमंडळातील बहुमताचा विचार केला – कपिल सिब्बल
-
राज्यसभेत बहुमत आमच्याकडे आहे. आयोगाने केवळ आमदारांच्या संख्येवर निर्णय दिला – कपिल सिब्बल
-
४० आमदारांच्या संख्येवरच शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. आयोगाने संघटनेचा कुठेही विचार केला नाही – कपिल सिब्बल
-
एकनाथ शिंदे बंड करणार हे त्यावेळी राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारींना माहिती होतं – कपिल सिब्बल
-
पक्षाचा व्हीप मोडून बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल या बैठकीत एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवण्यात आलं – कपिल सिब्बल
-
एकनाथ शिंदे विधिमंडळ गटनेता म्हणून सर्वकाही करत होते पण अशा प्रकारे तुम्ही ४०-४५ सदस्य परस्पर प्रतोदची नियुक्ती करू शकत नाही. हे बेकायदेशीर आहे – कपिल सिब्बल (सर्व छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम व संग्रहित)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”