-
पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीने राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे.
-
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक वक्तव्ये केली. त्याचा हा आढावा. ते शनिवारी (२५ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होते.
-
देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे – संजय राऊत
-
ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे – संजय राऊत
-
त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही – संजय राऊत
-
राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो – संजय राऊत
-
महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर, घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते – संजय राऊत
-
त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होते तेव्हा अशावेळी विरोधी पक्ष किंवा सरकार बनवू इच्छिता त्यांच्याशी बोलले असतील, बोलले होते – संजय राऊत
-
ठीक आहे, पण देवेंद्र फडणवीस इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करून काय सांगू इच्छित आहेत – संजय राऊत
-
महाराष्ट्रात मागील मोठा काळ पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटप करण्याचा ‘फॉर्म्युला’ तयार करण्यात आला आहे – संजय राऊत
-
मागील निवडणुकीत बारामती-पुणे भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटप होत होतं हे पुराव्यासह उघड झालं – संजय राऊत
-
पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात हे अनेकदा पुराव्यांसह उघड झालं आहे – संजय राऊत
-
पैसे वाटण्याचं काम पोलिसांच्या गाड्यांमधून सुरक्षितपणे होऊ शकतं – संजय राऊत
-
त्यामुळे कसब्याचे महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आरोप केला असेल तर त्यांच्याकडे पक्की माहिती आहे – संजय राऊत
-
त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण याआधी भाजपाच्या कालखंडात पोलिसांच्या गाडीतून पैशांची आवक-जावक, वाटप झाल्याची उदाहरणं समोर आली आहेत – संजय राऊत
-
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, मात्र आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि किती काळ या पदावर राहतील हे सांगता येत नाही – संजय राऊत
-
सत्ताधाऱ्यांच्या मनात निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत भय आहे – संजय राऊत
-
हे काही लोकशाहीचं लक्षण नाही. निवडणुकीला बेडरपणे सामोरं गेलं पाहिजे – संजय राऊत
-
भाजपा बेडर आणि निर्लज्जपणे सरकार पाडतं, पैशांचं वाटप करून आमदारांना विकत घेतं, हीच निर्भयता भाजपा निवडणूक घ्यायला का दाखवत नाही? – संजय राऊत
-
आमची इच्छा आहे की, निवडणुका ताबोडतोब घ्याव्यात – संजय राऊत
-
सर्व छायाचित्र – संग्रहित
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO