-
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना राज्यातील विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं एक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
-
राऊतांच्या विधानानंतर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानही मोठा गदारोळ बघायला मिळाला. यामुळे दोनवेळा सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. यावेळी भाजपा शिंदे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही संजय राऊतांच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली.
-
संजय राऊतांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटलं आहे. विधिमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
-
राजकारणात आपण एकमेकांच्या विरोधात असू शकतो. मात्र, या विधिमंडळाचा अभिमान सभागृहातील सर्वच सदस्यांना आहे. विधिमंडळाला चोर म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असंही शेलार म्हणाले.
-
“संजय राऊत यांनी विधिमंडळाचा अपमान करणारे उद्गार काढले आहेत. त्यांनी विधिमंडळाला थेट चोरमंडळ म्हटलं आहे. त्यामुळे राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यासंदर्भात मी पत्र दिलं आहे”, अशी प्रतिक्रिया भातखळकर यांनी दिली.
-
”संजय राऊत आमच्या मतांवर निवडून येतो आणि आम्हालाच चोर म्हणत आहे. मला वाटतं, हा संजय राऊत डाकू आहे डाकू… त्याच्यावर ३९५ कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा.” अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर संतोष बांगर यांनी गलिच्छ भाषेत संजय राऊतांना शिवीगाळ केली.
-
“विधिमंडळाबाबत अशा प्रकारे बोलणं हा लोकशाहीचा अपमान आहे. संजय राऊत हा पिसाळलेला माणूस आहे. त्यांनी संपूर्ण शिवसेनेची राखरांगोळी केली, तरीही त्यांचं समाधान झालेलं नाही”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
-
“संजय राऊत हे रोज खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करतात. आज त्यांनी लोकशाहीचं पवित्र मंदिर असलेल्या विधिमंडळाबाबत चुकीचं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना योग्य वेळी उत्तर देईल”, असेही ते म्हणाले.
-
विधिमंडळाला चोर म्हणणं हे सहन करण्यासारखं नाही. आपल्या राज्याचं विधानमंडळ हे देशातील सर्वोत्कृष्ट असं विधानमंडळ आहे. या विधानमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार कोणाला दिला, तर जनतेचा या सभागृहावर विश्वास राहणार नाही. त्यामुळे राऊतांच्या विधानाचं समर्थन करता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
“हा विषय एका पक्षापुरता मर्यादित नाही. विधिमंडळ म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा सभागृहाचे सदस्य आहे. मग तेही चोरमंडळाचे सदस्य ठरतात. आम्ही सर्वचचोर मंडळाचे सदस्य ठरतो. राऊतांनी केवळ चोरमंडळ नाही, तर गुंडमंडळ असा शब्दही वापरला आहे. आम्ही काय गुंड आहोत का?” असा प्रश्नही फडणवीसांनी विचारला.
-
“संजय राऊत हे साधे नेते नाहीत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. अशा मोठ्या सभागृहाचे सदस्य जर अशा प्रकारे बोलत असतील, तर आपण कसं सहन करायचं? त्यामुळे त्यांच्या या विधानाचा निषेध केला नाही, उद्या १०० राऊत तयार होऊन या विधानमंडळाला रोज चोर म्हणतील”, असेही ते म्हणाले.
-
नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका केली. तसेच भर अधिवेशनात अध्यक्षांसमोर “संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाही”, असं वक्तव्य त्यांनी केलं.
-
संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई झाली पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला आहे. दोन दिवसांनंतर अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. – गुलाबराव पाटील
-
आमची मागणी अशी आहे की, ज्यावेळी डान्सबार बंदी कायदा आणला होता. त्यावेळी शेट्टी नावाचे व्यक्ती डान्सबारचे अध्यक्ष होते. त्यांनीही सभागृहाच्या बाबतीत अपशब्द वापरले होते. त्यांना ज्या पद्धतीची शिक्षा दिली, तशीच शिक्षा संजय राऊतांना देण्यात यावी – गुलाबराव पाटील
-
संपूर्ण सभागृह संजय राऊतांच्या विधानाविरोधात आहे. सभागृहात एकानेही त्यांच्या विधानाचं समर्थन केलेलं नाही. त्यांचे हे विधान म्हणजे संपूर्ण सभागृहाचा अपमान आहे. त्यामुळे संजय राऊतांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
-
ज्या माणसाला आम्ही राज्यसभेवर पाठवलं, तोच माणूस आम्हाला चोर म्हणतो आहे, हे आमचं दुर्देव आहे. संजय राऊतांवर तत्काळ कारवाई करत त्यांना अटक करावी, अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केली.
-
जेलमधून आल्यानंतर संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. विधानमंडळाला चोर मंडळ संबोधणं हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध करावा, तेवढाच कमी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
सत्ताधाराऱ्यांसह महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनीही राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात विरोध पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली.
-
“मी आशिष शेलार यांच्या मताशी सहमत आहे. राजकीय मतभेद बाजुला ठेऊन हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. मात्र, संजय राऊत खरोखरच बोलले का? हे सुद्धा तपासण्याची गरज आहे”, असे ते म्हणाले.
-
आपण कोणत्याही पक्षाचे असतो, तरी पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण करतो. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला कोणालाही चोर म्हणण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
-
संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं, ते निषेधार्थ आहे. त्याचं कुणीही समर्थन करण्याचं काहीही कारण नाही. विधिमंडळाचा नाहीतर राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा कुणालाच अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
-
कोणी विधानसभेवर बोलत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो. पण अधिवेशनामध्ये अध्यक्षांनी एखादा निर्णय दिल्यानंतर सभागृह तहकूब करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
-
२४ दरम्यान, संजय राऊत यांच्या विधानाचं सुनील राऊत यांनी समर्थन केलं आहे. संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव संसदेत आणायला हवा. विधानसभेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. भाजपा आणि गद्दार आमदार संजय राऊतांना घाबरतात, त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी संजय राऊतांच्या विधानाचं १०० टक्के समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
“संजय राऊत हे आगलावे आहेत. महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं हे एक कार्टं आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका.” अशा शब्दांत शहाजीबापू पाटलांनी टीकास्त्र सोडलं.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”