-
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचा दारूण पराभव केला.
-
या विजयाने भाजपाला धक्का बसला, तर विरोधकांचा उत्साह वाढला.
-
या विजयानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी (६ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली.
-
या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि धंगेकरांच्या विजयाची खात्री का नव्हती? भाजपाचा पराभव का? अशा अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. त्याचा हा आढावा…
-
कसबा निवडणुकीतील यशाचं सूत्रं काय हे खरंतर रवींद्र धंगेकर यांनीच सांगितलं पाहिजे – शरद पवार
-
धंगेकरांना यश मिळेल, असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं, पण मला स्वतःला खात्री नव्हती – शरद पवार
-
धंगेकरांच्या विजयाची खात्री नसण्याचं मुख्य कारण म्हणजे नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ – शरद पवार
-
याच्या खोलात जायची गरज नाही. परंतु हा भाजपाचा गड आहे, असं अनेक वर्षे बोललं जातं – शरद पवार
-
दुसरी गोष्ट तिथं अनेक वर्षे गिरीश बापटांनी प्रतिनिधित्व केलं होतं – शरद पवार
-
बापट सतत लोकांमध्ये मिसळून राहणारे नेते आहेत – शरद पवार
-
गिरीश बापट यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भाजपा आणि त्यांच्या परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते – शरद पवार
-
मात्र, पुण्यातील भाजपा सोडून इतर सर्वांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते – शरद पवार
-
त्यामुळे साहजिकपणे ज्या मतदारसंघात त्यांचे लक्ष केंद्रित होते तो मतदारसंघ हा आपल्याला जड जाईल, असं आम्हाला वाटत होतं – शरद पवार
-
शेवटी शेवटी एक गोष्ट लक्षात आली की, गिरीश बापट यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याबाबत कुजबुज ऐकायला मिळाली – शरद पवार
-
याचा अर्थ गिरीश बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर त्याचे परिणाम होतील, अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल, अशी शंका होती – शरद पवार
-
मात्र, निवडणूक झाल्यावर जी माहिती मिळाली ती म्हणजे ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ती व्यक्ती वर्षोनुवर्षे कशाचीही अपेक्षा न करता लोकांमध्ये काम करणारी होती – शरद पवार
-
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा असा उमेदवार आहे जो कधीच चारचाकी गाडीत बसत नाही. हा दोनचाकी गाडीवर फिरतो – शरद पवार
-
त्यामुळे दोन पाय असणाऱ्या सर्व मतदारांचं लक्ष या उमेदवाराकडे आहे. त्याचा फायदा होईल, असं ऐकायला मिळालं. ते १०० टक्के खरं ठरलं – शरद पवार
-
आगामी निवडणुकीत महाविकासआघाडी म्हणून लढण्याबाबतची चर्चा माझ्याशी कुणी केलेली नाही. त्या चर्चेत मी नाही – शरद पवार
-
या चर्चेत माझ्या पक्षाच्या वतीने दुसरे सहकारी आहेत. ते बसून निर्णय घेतील – शरद पवार
-
उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात मविआच्या लोकांना एकत्र ठेवणं आणि एकत्र निर्णय घेणं आणि एकत्र निवडणुकांना सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल – शरद पवार
-
सध्या लोकांना बदल हवाय हे मी बघतोय – शरद पवार
-
मविआच्या सगळ्या नेत्यांशी आम्ही बोलणार आहे – शरद पवार
-
बहुसंख्य लोकांनी मला सांगितलं की मविआचा उमेदवार, त्यांनी केलेल्या कामाची नोंद त्यांनी घेतली आहे – शरद पवार
-
कसबा पोटनिवडणुकीत मिळवलेला विजय हा काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा नसून रवींद्र धंगेकरांचा आहे हे भाजपाचं आकलन असेल – शरद पवार
-
चांगली गोष्ट आहे. किमान त्यांनी ज्यांचा विजय झाला, असे विजय देणारे उमेदवार आमच्या सगळ्यांचे होते हे मान्य केलं – शरद पवार
-
कारण निवडणुकीच्या आधी त्यांची वक्तव्यं काय काय होती, हे भाषणात आलं आहे – शरद पवार
-
आता त्यात थोडासा गुणात्मक बदल आहे. किमान निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगलं बोलतायत. चांगली गोष्ट आहे – शरद पवार (सर्व छायाचित्र – संग्रहित)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली