-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाणे येथील निवासस्थानी धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
-
सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवांना आणि उपस्थित पत्रकारांनाही त्यांनी यावेळी रंग लावला.
-
यावेळी नातू रुद्राशकडून रंग लावून घेत त्यांनी नातवाचा हट्टही पुरवला.
-
मुख्यमंत्री हे जनतेमध्ये मिसळून रंगपंचमी साजरी करत असल्याचे पाहून पोलिसांनीदेखील आपुलकीच्या भावनेने रंग लावून घेत त्यांच्यासह धुळवड साजरी केली.
-
यावेळी बोलताना, राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वच सण उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाऊ लागले आहेत. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळी पाठोपाठ धुळवडही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
-
तसेच राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगाचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरी करा, असे आवाहन त्यांनी केले.
-
पुढे बोलताना, राज्यातील जनतेला होळी आणि धुळवड आणि रंगपंचमीच्या शुभेच्छाही दिल्या.
-
याबरोबरच राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असेही ते म्हणाले.
-
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय आणि मोठ्या प्रमाणात कायकर्ते उपस्थित होते.
-
दरम्यान, टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे जाऊन त्यांनी आनंद दिघे यांनाही विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांच्या फोटोला रंगही लावला.
-
आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देत त्यांच्यासोबत धुळवड साजरी केली.
-
यावेळी ढोल ताशांच्या गजरात परिसर दणाणला होता.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”