-
खेडमधील सभेनंतर आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. तसेच, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी सुनावलं आहे.
-
कसब्यातील मविआचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं.
-
रवींद्र धंगेकर आमचे नगरसेवक होते. त्यामुळे माझा माणूस आमदार झालाय याचा मला आनंद आहे. सोबत काँग्रेस-राष्ट्रवादीही आहेत. कसब्यातल्या निवडणुकीनं हे दाखवलंय की विरोधक एकत्र आले, तर आपण जिंकू शकतो – उद्धव ठाकरे
-
यावेळी उद्धव ठाकरेंनी जॉर्ज फर्नांडिसांनी त्यांच्या उमेदीच्या वर्षांमध्ये काँग्रेसचे मातब्बर उमेदवार स. का. पाटील यांच्या केलेल्या पराभवाची आठवण सांगितली.
-
सगळ्यांना तेव्हा वाटलं की एवढा मातब्बर नेता समोर असताना जॉर्ज फर्नांडिस काय करणार? पण चमत्कार झाला आणि फर्नांडिस विजयी झाले. त्याच विजयाची आठवण आज कसबा निवडणुकीने करून दिली – उद्धव ठाकरे
-
उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उमेदवार असू शकतात, अशा आशयाचं विधान संजय राऊतांनी केलं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंनी ती शक्यता फेटाळून लावली आहे.
-
माझ्या मनात असं कोणतंही स्वप्न नाही. मी स्वप्नात रंगणारा नाही. मी अनेकदा सांगितलंय की मी जबाबदारी पार पाडतो. तशीच माझ्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली होती. पण आता देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम सर्वसामान्य माणसानं खांद्यावर घेणं गरजेचं आहे – उद्धव ठाकरे
-
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी यावेळी समाचार घेतला आहे. “आम्ही म्हणालो होतो की बदला घेऊ. आता सत्तेत आल्यानंतर आमचा बदला हाच आहे की आम्ही सगळ्यांना माफ केलंय”, असं फडणवीस म्हणाले होते.
-
त्यावर मी काय बोलू. जे त्यांच्यासोबत गेलेले नाहीत, असे राजन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक, अनिल परब यांच्यावर ज्या धाडी चालू आहेत, त्या गोष्टी कसल्या आहेत नेमक्या? त्या सूडामध्ये येत नाहीत का? सूडाने पेटून तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करत आहात – उद्धव ठाकरे
-
मी खेडच्या सभेत सांगितलं की कुटुंबच्या कुटुंब टीका करून बदनाम करायची, उद्ध्वस्त करायची. तरीही ती उद्ध्वस्त नाही झाली तर लाळघोटेपणाने परत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं हेच मेघालयमध्ये दिसलंय – उद्धव ठाकरे
-
कोनराड संगमांच्या विरुद्ध मोदी आणि अमित शाहांनी अत्यंत घाणेरडा अपप्रचार केला होता की “मेघालय हे देशातलं सगळ्यात भ्रष्ट राज्य आहे. केंद्राच्या अनेक योजना मेघालयमधल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतच नाहीत. संगमांनी गरीबांचा पैसा खाल्लेला आहे”. पण आता जणूकाही काही झालंच नाही अशा अत्यंत लाचार आणि केविलवाण्या पद्धतीने पुन्हा त्याच संगमांच्या बाजूला जाऊन बसलेत – उद्धव ठाकरे
-
आत्तापर्यंत आमच्यातले जे लोक तुम्ही आरोप करून, चौकशीचा ससेमिरा लावून पक्षात घेतले त्यांच्यावर तुम्ही गोमूत्र शिंपडलंय का? ते शुद्ध झालेत का? – उद्धव ठाकरे
-
ते शुद्ध झाले असतील, तर आज आमच्या लोकांच्या विरोधात तुम्ही लागले आहात, त्यांनीही तुमच्या पक्षात यायचं का? तसं झालं, तर तेही शुद्ध झाले असं जाहीर करणार का? हा सत्तापिपासूपणा आहे – उद्धव ठाकरे
-
मला वाटतं की उघडउघड केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या लोकांना नामोहरम करायचं, पक्षात या नाहीतर तुरुंगात जा असं करायचं, असं भाजपाचं धोरण आहे. हर्षवर्धन पाटील तर म्हणालेच आहेत की आता त्यांना छान झोप लागते.चौकशी वगैरे काही होत नाही – उद्धव ठाकरे
-
मध्य प्रदेशमधल्या एका मंत्र्याने विरोधी पक्षातल्या लोकांना दम दिलाय की एक तर भाजपात या नाहीतर कारवाईच्या बुलडोझरला सामोरे जा. आता जनतेच्या मतांचा बुलडोझर हुकुमशाहीविरुद्ध फिरवावाच लागेल – उद्धव ठाकरे
-
दरम्यान, आमच्या मनात कुणाबद्दलही राग नसल्याचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्यामुळे भाजपाशी ठाकरेंचं पुन्हा पॅचअप होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावरही उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय.
-
मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. माझ्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. याबद्दल तुम्ही त्यांना स्पष्टपणे विचारा – उद्धव ठाकरे
-
फडणवीसांनी ‘काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात’, असा टोला विरोधकांना लगावला होता. त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लक्ष्य केलंय.
-
ते त्यांच्या पक्षातल्या लोकांबद्दल बोलतायत. हे त्यांना कळलं हे बरं झालं. कारण काही लोकांना त्यांनी तशी नोकरीच दिलीये की रोज उठून ठाकरेंबद्दल बोला. हे त्यांच्याही लक्षात आलंय की रोज ठाकरेंविरोधात शिमगा करून काही होत नाहीये – उद्धव ठाकरे
-
मी सोशल मीडियावर बघितलं की मुंबईत ५० खोक्यांची होळी लोकांनी केलीये. त्यामुळे त्यांनी शिमगा केला तरी खोकेवाल्यांची होळी आता लोक करत आहेत – उद्धव ठाकरे
-
दिवस नेहमी सारखे राहात नाहीत. फिरतात. एक काळ असा होता की कुणाला विश्वास नव्हता की काँग्रेसला कुठला पर्याय असेल की नाही. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. सूर्य उगवतो आणि मावळतो. बघितलं जाईल – उद्धव ठाकरे
-
हल्ली जनतेच्या हिताचे प्रश्न ऐरणीवर येऊच दिले जात नाहीत. ते येत आहेत असं वाटत असताना लगेच दुसरा काहीतरी वाद निर्माण केला जातो. त्यामुळे जनतेच्या जीवन-मरणाचे प्रश्न टाळले जातात – उद्धव ठाकरे
-
अवकाळी पाऊस हा आपल्याला गेल्या काही वर्षांत लागलेला शाप आहे. नैसर्गित संकटं आपण टाळू शकत नाहीत. पण अशावेळी ज्यांचं नुकसान झालंय, त्यांना तातडीने आधार देणं गरजेचं असतं – उद्धव ठाकरे
-
शेतकरी आपला अन्नदाता आहे. जर शेतकरी राबला नाही, धान्य पिकवलं नाही तर आपली काय हालत होईल? हा सध्या सत्तेत असलेल्या राजकारण्यांनी निदान स्वत:साठी स्वार्थी विचार करावा – उद्धव ठाकरे
-
ते म्हणाले, पंचनाम्यांचे तात्काळ आदेश दिले आहेत. ते द्यावेच लागतात. पण ते दिल्यानंतर आपली यंत्रणा शेतकऱ्याच्या दारापर्यंत पोहोचतेय की नाही हे पाहावं लागेल. निकष न लावता तातडीने शेतकऱ्यांना आधार द्यायला हवा – उद्धव ठाकरे
-
अवकाळी काल-परवाचा विषय आहे. पण त्याआधीही कांद्याचं आंदोलन पेटलेलंच आहे. मग ते कुणाचं संकट आहे? – उद्धव ठाकरे
-
माझ्यावर टीका करत होते की यांनी घरी बसून कारभार केला. केला. पण आता तुम्ही बांधाबांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्या. नाहीतर आम्ही आहोतच रस्त्यावर उतरायला – उद्धव ठाकरे

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…