-
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल २ मार्चला लागला. या निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाली.
-
हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव करत तब्बल २८ वर्षांनंतर भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने काँग्रेसची सत्ता आली.
-
शालेय जीवनापासूनच धंगेकरांना राजकारणात रस होता. शिवसेनेत ते कार्यरत होते.
-
शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेचं इंजिन पकडलं.
-
त्यानंतर धंगेकरांनी २०१९ च्या निवडणुकांवेळी धंगेकरांनी घड्याळ हाती बांधत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
-
ते चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
-
कसब्याचे आमदार झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी ‘झी २४ तास’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी निवडणुकीबरोबरच अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
-
“तुम्ही शालेय जीवनापासून शिवसेनेकडे आकर्षित झालात. घरी राजकीय पार्श्वभूमी होती का?”, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
-
यावर उत्तर देताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “मी शेतकरी कुटुंबात जन्मलो आहे. आमचा चुन्याचा व्यवसाय होता. माझे आई-वडील खूप सामान्य आहेत. मी आमदार झालो, हे माझ्या आईला माहितही नाही”.
-
आमदार झाल्यावर आईची प्रतिक्रिया काय होती? या प्रश्नावर उत्तर देताना धंगेकर म्हणाले, “आमदार म्हणजे काय हेच माझ्या आईला माहीत नाही. माझा मुलगा आमदार झाला एवढंच तिला माहीत आहे. यापलिकडे तिला काहीही माहीत नाही”.
-
(सर्व फोटो: रवींद्र धंगेकर/ फेसबुक)
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल