-
जुन्या पेन्शन योजनेवरून महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
-
राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
-
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या बेमुदत संपामुळे स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालये ओस पडली आहेत.
-
राज्यातील अनेक ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी काळी फीत बांधून आंदोलनं केली. राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे. जाणून घेऊन या.
-
कोल्हापूर जिल्ह्यातील ८० हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
-
या संपाला प्रतिसाद मिळाल्याने शासकीय कार्यालय अधिकारी, कर्मचाऱ्यांअभावी कार्यालये ओस पडली आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.
-
आज कोल्हापुरातील टाऊन हॉल बाग येथे सकाळी ११ वाजता सरकारी कर्मचाऱ्यांकडून रॅली काढण्यात आली.
-
पुण्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आज आंदोलनात सहभाग घेतला.
-
पिंपरी चिंचवड महापालिकाही कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.
-
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन हजार कर्मचारी आज संपावर होते.
-
तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पुणे विभागाच्या वतीने मंगळवारी काम बंद आंदोलन करण्यात आले
-
रायगड जिल्ह्यातही आज १५ हजार कर्मचारी संपात सहभाग घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात शुकशुकाट बघायला मिळाला.
-
छत्रपती संभाजीनगरमध्येही आज जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील परिचारिकांनी संपात सहभाग घेतला होता.
-
त्यामुळे रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय झाल्याचं बघायला मिळालं.
-
तसेच या परिचारिकांनी मेट्रन ऑफिससमोर एकत्र येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
-
पालघरमधील सुमारे सात हजार जिल्हा परिषद कर्मचारी व पाच हजार महसूल कर्मचारी व शिक्षक संपात सहभागी झाले होते.
-
नाशिकमध्येही महापालिकेसह इतर शासकीय कार्यालयातील एकूण २५ हजार कर्मचारी संपात सहभागी झाले होते.
-
त्यामुळे कोट्यवधींचे शासकीय व्यवहार ठप्प झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेतील कामकाज विस्कळीत झाले होते.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य