-
गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने एबीपी न्यूजला तुरुंगातून मुलाखत दिली आहे.
-
या मुलाखतीत त्याने मूसेवालाची हत्या ते सलमान खानला दिल्या धमकीबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. याबरोबरच त्याने त्याच्या वयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा आहे.
-
तो म्हणाला, मी गॅंगस्टर होईल, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. मी चंदीगड विद्यापीठात कायद्याचा विद्यार्थी होतो. मला परिस्थितीने गुंड बनवलं.
-
महाविद्यालयीन काळात मी राजकारणातही सक्रीय होतो. त्यावेळी विरोधीगटातील विद्यार्थ्यांशी झालेल्या भांडणानंतर मला आणि माझ्या काही सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून मी तुरुंगातच आहे. मला या तुरुंगानेच गॅंगस्टर बनवलं.
-
पुढे बोलताना तो म्हणाला, तुरुंगात काही गुंडांनी आमच्या काही सहकाऱ्यांची हत्या केला. पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला शस्र उचलावी लागली. सहकाऱ्यांचा बदला घेण्यासाठी आम्हाला चुकीच्या मार्गावर जावं लागलं.
-
यावेळी बोलताना त्याने सिद्धू मूसेवालाची हत्या का केली? याचा खुसासाही केला. “सिद्धू मूसेवालाच्या हत्येच्या प्लॅनिंगबद्दल मला माहीत होतं. पण हे प्लॅनिंग मी केलं नाही. गोल्डी ब्रार आणि माझा भाचा सचिनने हे प्लॅनिंग केलं होतं.
-
माझा भाऊ विक्की मिड्डूखेडा याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आम्ही सिद्धू मूसेवालाची हत्या केली. विक्कीची हत्या होण्यापूर्वी सिद्धू मूसेवालाशी आमचं काहीही वैर नव्हतं. पण तो आमच्या विरोधी गँग्सना हाताशी धरून आमच्याविरोधात कारवाई करत होता, असा खुलासा लॉरेन्स बिश्नोईने केला आहे.
-
दरम्यान, यावेळी त्याने सलमान खानला दिलेल्या धमकीवरही भाष्य केलं. “माझ्या समाजातील लोकांचा सलमान खानवर खूप राग आहे. त्याने कायम आमच्या समाजाला तुच्छ लेखलं. आमच्या परिसरात प्राण्याचा जीव घेतला जात नाही. झाडं कापण्यास बंदी आहे. मात्र, तिथे येत सलमान खानने हरीणाची शिकार केली.” असे तो म्हणाला.
-
“माझा सलमान खानवर लहानपासून राग आहे. कधी ना कधी सलमान खानचा अहंकार मोडणार आहे. त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन माफी मागितली पाहिजे. सलमान खानने बिश्नोई समाजातील लोकांना पैशांचं आमिष दाखवलं होतं. आम्ही सलमान खानला मारणार आहोत,” अशी धमकीही त्याने दिली.

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी