-
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यात विविध विषयांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली आहे. (सर्व फोटो सौजन्य -ट्विटर)
-
मी शिवसेना सोडावी यासाठी वातावरण निर्मिती केली गेली. उद्धव ठाकरेच त्यामागे होते असा आरोप राज ठाकरेंनी केला
-
असंख्य लोकांनी शिवसेना उभी केली, अनेक लोकांच्या कष्टातून संघटना उभी केली. मी जेव्हा त्या पक्षातून बाहेर पडलो आणि त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर मी इथे जेव्हा भाषण केलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं की माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. मी तेव्हा हेदेखील म्हटलं होतं की हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार. खड्ड्यात पक्ष घातल्यानंतर त्याचा वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून मी पक्ष सोडतोय.
-
गेल्या दोन वर्षांपासून आपण महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाचा खेळ, बट्याबोळ सर्वच पाहतो आहे. हे सगळं राजकारण पाहात असताना मला वाईट वाटत होतं पण ज्यावेळेला शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं की तुझं की माझं तेव्हा वेदना होत होत्या.
-
मी शिवसेना सोडल्यावर काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेला शिवसेनापक्षप्रमुख पद हवं होतं. राजला मिळालं नाही म्हणून तो बाहेर पडला. माझ्या स्वप्नातही हा विचार आला नव्हता.
-
राज ठाकरेंच्या या मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी झाली होती
-
नारायण राणेंनी शिवसेनाच सोडली नसती. मी तुम्हाला प्रसंग सांगतो. राणे पक्ष सोडणार कळत होतं मी त्यांना फोन केला. ते म्हणाले जायचं नाही. मी त्यांना सांगितलं की बाळासाहेबांशी बोलतो त्यावेळी बाळासाहेबांना फोन केला ते मला म्हणाले की नारायण राणेला घेऊन ये. पाच मिनिटांनी फोन आला की नको आणूस मला तेव्हा त्यांच्या मागून कुणीतरी बोलत होतं. मला राणेंना सांगावं लागलं की येऊ नका. मग सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्या
-
लोकांनी शिवसेनेतून बाहेर पडावं यासाठी परिस्थिती निर्माण केली गेली. जी परिस्थिती तेव्हा निर्माण झाली त्याचा शेवट हा असा झाला. मला त्यांच्या राजकारणाशी काहीही घेणंदेणं नाही. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
-
एकनाथ शिंदेंना एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रासाठी काम करा. उद्धव ठाकरे सभा घेतात तिथे उत्तर द्यायला सभा घेऊ नका. पेन्शनचा विषय अडकला आहे तो विषय मिटवा, शेतकऱ्यांचे विषय आहेत ते सगळे हातात घ्या. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भेटा सभा कशाला घेता?
-
मशिदींवरचे भोंगे परत वाजू लागले आहेत. एक तर तुम्ही ते बंद करा किंवा मग आम्ही काय करतो आहे त्याकडे दुर्लक्ष करा आम्ही आमच्या पद्धतीने हे भोंगे बंद करू. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच सांगलीतल्या या गोष्टीकडे लक्ष द्या असंही राज ठाकरे म्हणाले.
-
मी मध्यंतरी मुंबईतल्या माहीम भागात गेलो होतो. मला तेव्हा समुद्रात लोक दिसले. मला काय आहे ते समजेना. मी एकाला सांगितलं जरा बघ काय आहे ते. त्यावेळी मला त्या माणसाने ड्रोन फिरतात ना त्यातून शूट करून माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या.
-
समुद्रात मखदुम बाबा दर्गा उभा केला आहे. माहिम पोलीस स्टेशन तिथे जवळ आहे मात्र कुणाचंही लक्ष नाही. महापालिकेचे लोक फिरत असतात त्यांनी पाहिलं नाही. हे नवीन हाजी अली तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना, महापालिका आयुक्तांनी मी आजच सांगतो की महिन्याभरात कारवाई झाली नाही त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग काय व्हायचं ते होऊ देत असंही राज ठाकरे म्हणाले.

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल