-
मुंबईतील सायन रुग्णालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्यावतीने आयोजित ‘वसंतोत्सवात’ आज राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
-
यावेळी बोलताना त्यांनी राजकीय, सामाजिक विषयांसह विविध प्रश्नांची दिसखुलासपणे उत्तरं दिलं.
-
ते म्हणाले, प्रत्येक राज्यात त्यांच्या त्यांच्या भाषेचा मान राखला जातो, मग महाराष्ट्रात मराठीचा मान का राखला जात नाही? महाराष्ट्रात हिंदी आणि इंग्रजीचा आग्रह केला जातो. हे योग्य नाही. त्यासाठी आम्ही आधी हात जोडून सांगितलं आणि त्यानंतर हात सोडून सांगितलं.
-
यावेळी त्यांनी मराठी शाळांच्या परिस्थितीवरही भाष्य केलं. मराठी शाळेचा ऱ्हास होतोय, हा टाहो फक्त आपण फोडतोय. प्रत्येक राज्यात त्यांच्या भाषांच्या शाळांची हिच अवस्था आहे. आपल्याकडे मराठी शाळा सेमी इंग्रजीत यायला लागल्या आहेत. पण तुम्ही बालमोहनमधील मराठी शाळा बघितली तर ती शाळा पूर्णपणे भरली असते असे ते म्हणाले.
-
पुढे बोलताना त्यांनी तरुणांना राजकारणात येण्याचं आवाहनही केलं. राजकारणाला तुच्छ मानून चालणार नाही. कारण तुमचं दैनंदिन आयुष्य राजकारणाशी निगडित आहे. ज्यांची राजकारणात येण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. राजकारणा येतात माझ्याच पक्षात या असं मी म्हणत नाही. जो आवडीचा पक्ष असेल त्यात काम करा, पण राजकारण या, असे ते म्हणाले.
-
यावेळी बोलताना त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांना कुत्र चावल्याचा प्रसंगही सांगितला. एकेदिवशी माझी पत्रकार परिषद होती. मी बाजुच्या रुममधून तयार होऊन पत्रकार परिषदेला जात होतो. तेवढ्यात ती तोंड धरून आली. मला हाताने बाजुला हो म्हणत बाथरुममध्ये गेली. मी खाली बघितलं तर सगळीकडे रक्ताचे दाग दिसत होते. तिच्या ओठांचे पाच तुकडे झाले होते, त्यावेळी काय करावं, मलाच सुचत नव्हतं, असे ते म्हणाले.
-
पुढे बोलताना त्यांनी अमित ठाकरेंच्या राजकीय वाटचालीबाबातही भाष्य केलं. “मी अमितला राजकारणात आणू शकतो, लादू शकत नाही. बाप म्हणून त्याला आणण्याचं माझं काम आहे. त्याला स्वीकारायचं काम आहे जनतेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला जबरदस्ती करु शकत नाही, असे ते म्हणाले.
-
दरम्यान, राज ठाकरेंना त्यांच्या बायोपिकबद्दल विचारलं असता, चित्रपट निर्मिती हे माझं पॅशन आहे. त्याचं काम सध्या सुरु आहे, पण माझ्यावर आत्मचरित्र किंवा बायोपिक नको अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
पुढे बोलताना, राजकारणाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. फटके खाण्याची सहनशीलता तुमच्याकडे हवी. राजकारणात तुम्हाला प्रत्येक माणूस गुण दोषासह स्वीकारावा लागतो. सकाळी माझ्याकडे माणसं येतात त्याला मी ओपीडी म्हणतो. मला माझे अनेक मित्र फोन केल्यावर विचारतात ओपीडी चालू आहे का?, अशी मिश्किल टीप्पणीही त्यांनी केली.

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल