-
मोदी आडनावारून केलेल्या वक्तव्यानंतर काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी मानहानी प्रकरणात दोषी ठरवले होते. तसेच त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. (Indian Express)
-
राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. (Indian Express)
-
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?” (Indian Express)
-
या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. (PTI)
-
सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता. (Indian Express)
-
दरम्यान, याप्रकरणी काल राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांच्या शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. (PTI)
-
याच पार्श्वभूमीवर आज आपण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संपत्तीबाबत माहिती जाणून घेऊया. (PTI)
-
तर २०१४ च्या प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधी यांची संपत्ती ९.४ कोटी रुपये होती, तर त्यांच्यावर १८ लाख रुपयांचे कर्ज होते. (Indian Express)
-
२०१९च्या निवडणुकीच्या वेळेला राहुल गांधी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार , त्यांच्याकडे १५.८८ कोटींची संपत्ती असून त्यांच्यावर ७२ लाखांचे कर्ज होते. (Indian Express)
-
प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, राहुल गांधी यांच्याकडे स्वतःची कार नाही आहे. तर त्यांच्या दोन वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये १७.९३ लाख जमा होते. (Indian Express)
-
२०१४ च्या प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधींकडे एकूण ३३३.३ ग्राम सोने होते. (PTI)
-
येथे देण्यात आलेली माहिती उपलब्ध मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. (Indian Express)

जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”