-
रामनवमीनिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
-
या व्हिडीओत खासदार नवनीत राणा या बुलेट चालवताना दिसत आहे.
-
नवनीत राणा यांनी काळा पोशाख आणि डोक्याला भगवा गमछा बांधून बुलेट राईडचा आनंद घेतला.
-
हम अखंड ब्रम्हांड के राजा श्रीराम के भक्त है ना, हार की फिक्र करते है, ना जितका जिक्र करते है, असे म्हणत त्यांनी बुलेट राईडला सुरुवात केली.
-
बुलेट चालवताना त्यांनी ‘जय श्री राम’चा अशी घोषणाबाजी करत अमरावतीकरांना रामनवमीच्या शुभेच्छाही दिल्या.
-
दरम्यान, येत्या हनुमान जयंतीला शहरातील छत्रीतला परिसरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते हनुमानाच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.
-
या सोहळ्यात हनुमान चालीसा पठण देखील केले जाणार आहे. तसेच हनुमान चालीसा पठाण सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांना चांदीचा शिक्का आणि हनुमान चालीसाचे पुस्तक दिले जाणार आहे.
-
सोशल मीडियावर हनुमान जयंतीच्या तयारी संदर्भात खासदार नवनीत राणा यांचे बॅनर व्हायरल होत आहे. यावर नवनीत राणा यांचा ‘हिंदू शेरणी’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
-
मुंबई आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचे ‘हिंदू शेरणी नावाचे पोस्टर बघायला मिळत आहे.

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई