-
गुरूवारी देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
-
रामनवमीनिमित्त देशभरात शोभायात्रेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
मात्र, काही ठिकाणी या उत्सवाला गालबोल लागल्याचं बघायला मिळालं.
-
महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, दिल्ली आणि गुजरातमध्ये हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटना घडल्या.
-
रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेवर दडफेक करण्यात आली. या दगडफेकी अनेक जण गंभीर जखमी झाले.
-
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
-
सद्यस्थिती हावडा शहरात शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
-
दरम्यान, या घटनेबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही प्रतिक्रिया दिली. हाडवा येथील घटना दुर्देवी असून दंगा करणारे देशद्रोही आहेत, असं त्या म्हणाल्या.
-
गुजरातच्या वडोदरा येथील भुतलीझापा परिसरात रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली आहे.
-
या दगडफेकीत कोणालाही इजा झाली नसून परिसरातील चारचाकी गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
-
महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीही रामनवमीच्या दिवशी या भागात अशाच प्रकारे शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली होती.
-
कर्नाटकच्या हस्सन जिल्ह्यातही रामनवमीच्या दिवशी दोन घटात हिंसाचार झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी एका व्यक्तीने अन्य एका व्यक्तीवर चाकुने हल्ला केला. या भागात सध्या शांतता असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
दिल्लीतील जहांगिरपुरी भागातही रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी या भागात राडा झाला होता.
-
पश्चिम बंगाल, गुजरात, दिल्ली आणि कर्नटाकसह महाराष्ट्रातील काही भागातही दगडफेक करण्यात आली.
-
संभाजीनगरमध्ये किराडीपुरा भागातील राम मंदिराजवळ दोन गटात तुफान राडा झाला.
-
दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेकही करण्यात आली. तसेच यावेळी पोलिसांच्या वाहनांसह खासगी वाहनं देखील जाळण्यात आली.
-
संभाजीनगर बरोबरच मुंबईतील मालवणी भागातही रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेदरम्यान राडा झाल्याचं बघायला मिळालं. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतलं आहे.
-
तसेच जळगावमध्येही काही ठिकाणी दगडफेक झाल्याची माहिती आहे.

मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद