-
जर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपणार असेल किंवा आधीच संपली असेल तर टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. कारण आम्ही तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण करण्याचा सोपा मार्ग सांगणार आहोत.
-
ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यासाठी सरकार ३० दिवसांची मुदत देण्यात येते.
-
आता ड्रायव्हिंग लायसन्स एकदम सोप्या पद्धतीने कसे नूतनीकरण करणार आहोत हे जाणून घेऊयात.
-
ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणाच्या वेळी तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील. सर्वात पहिल्यांदा तुम्ही रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट जावं लागेल.
-
https://parivahan.gov.in/parivahan/ वर जा. तुम्हाला होमपेजच्या डाव्या बाजूला Apply Online वर क्लिक करावे लागेल.
-
यानंतर ‘ड्रायव्हिंग लायसन्सवरील सेवा’ वर क्लिक करा आणि नंतर नमूद केलेल्या टप्प्यांचे पालन करा. आता तुम्हाला अर्ज भरण्यासोबतच कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यासह तुम्हाला त्याचे शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागेल.
-
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा. आता तुम्ही ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण अर्ज पूर्ण केला आहे. जर सर्व काही बरोबर असेल, तर नवीन ड्रायव्हिंग लायसन्स निश्चित वेळेपर्यंत तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल.
-
ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करताना तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यात कालबाह्य ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट साइज फोटो आणि आधार कार्डचा समावेश आहे.
-
तुमचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला फॉर्म 1A भरावा लागेल आणि ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी डॉक्टरांकडून प्रमाणित करून घ्यावे लागेल.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…