-
वर्धा : मार्च अखेरीस उन्हाची काहिली सुरू झाली. त्याची दखल घेत वनविभाग सतर्क झाला.
-
एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात जंगलातील पाणवठे शुष्क पडू लागल्याचे दिसून आल्याने वन्य प्राणी गावांकडे धाव घेतील, म्हणून पाणी पुरवठा करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.
-
रस्त्यालगतच्या परिसरात टँकरने तर दुर्गम जंगलात बैलगाडीने पाणी पुरवणे सुरू झाले.
-
उपविभागीय वनाधिकारी नितीन जाधव म्हणाले की, बिबट्यांचा अधिवास असलेल्या ब्राम्हणवाडा परिसरात तीन दिवसापासून टँकरने पाणी पुरवणे सुरू झाले.
-
तशी तजवीज पूर्वीच करण्यात आली होती, तर निवासी वनाधिकारी पवार यांनी नमूद केले की, जिल्ह्यातील ९२ कृत्रिम व ५३ नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी भरणे सुरू आहे.
-
काही ठिकाणी सौरपंप आहेत. पण बाहेरून पाणी आणावेच लागते.
-
पुढील दोन महिने प्राण्यांची तहान भागविण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
-
माकड, बिबटे, वाघ, मोर, अस्वल, कोल्हे, लांडगे, सालुंद्री व अन्य प्राणी या पाणवठ्यावर धाव घेत असल्याचे दिसून येते.
-
काही भागातील नाले आटल्यावर तर वनविभागाची कसोटीच लागणार.
-
जिल्हा वनाधिकारी राकेश सेपट म्हणाले की, दरवर्षी काही भागात मार्चच्या अखेरीस पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते.
-
त्यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना गरजेनुसार प्रामुख्याने बैलगाडीने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहे.
-
मनुष्याची ही सतर्कता बोर अभयारण्यातील वन्यजीवास खूप आधार देणारी ठरावी. (सर्व फोटो सौजन्य : वनविभाग, वर्धा)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य