-
ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेना ( ठाकरे गट ) काँग्रेस, राष्ट्रवादीने बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयावर ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढला होता. यानंतर झालेल्या सभेत आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं.
-
विद्यमान सरकार औटघटकेचे असून, ठाण्यातून निवडणूक लढून जिंकून दाखवणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
-
याला आता मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “लोकशाहीत कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. शेवटी जनता ठरवत असते, कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं.”
-
“बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शाखाप्रमूख म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
-
“शिवसेना मोठी करण्यासाठी माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून घरावर तुळशीपत्र ठेवलं.”
-
“सोनाचा चमचा घेऊन आलेले आणि आयत्या पिटावर रेघोट्या ओडणाऱ्याबद्दल मी काय बोलणार,” असा टोला एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
-
तसेच, उद्धव ठाकरेंनी ‘राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे’, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर एकनाथ शिंदेंनी भाष्य करत उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
-
एकनाथ शिंदे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांना फडतूस संबोधण्यात आलं. फडणवीसांनी खूप संयम बाळगला. ते उद्धट किंवा उद्ध्वस्त ठाकरे म्हणाले नाही. ही संस्कृती आहे. हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व खेळ सुरु आहे.”
-
“हा खेळ लोक ओळखतात. सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न असून, ती बिलकुल मिळणार नाही. आम्हाला तिखट बोलता येते.”
-
“आमच्याकडे बरेचसे काय-काय आहे, पण आम्ही मर्यादा पाळून आहोत. योग्यवेळी सर्व बोलेन,” असा इशारा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
-
“देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना आहे का? देवेंद्र फडवणीस महापौर, आमदार, विरोधीपक्षनेते, मुख्यंमत्री आणि आता उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आहेत.”
-
“त्यांनी कामातून त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आहे. बोलणाऱ्यांचं काय कर्तृत्व आहे? नावं सोडलं तर काय आहे तुमच्याकडं? कोणावर बोलत आहात?,” असा सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर