-
गेल्या काही दिवसांपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधानांची पदवी बनावट असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
-
Entire Political Science अशी पदव्युत्तर पदवी अर्थात मास्टर्सची डिग्री पंतप्रधानांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे.
-
मात्र, यावर विरोधकांकडून आक्षेप घेतला जातोय. मुळात Entire Political Science असा पदवीचा विषयच नसल्याचा विरोधकांचा दावा आहे.
-
शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रमाणपत्रावर वापरण्यात आलेला फाँट मायक्रोसॉफ्टकडून १९९२ साली तयार करण्यात आला. पण मोदींच्या डिग्रीवर १९८३ सालची तारीख आहे. त्यामुळे यावर आक्षेप घेतला जात आहे.
-
मनीष सिसोदियांनी तर तिहार जेलमधून पत्र लिहून पंतप्रधानांच्या अल्प शिक्षणावर चिंता व्यक्त केली. एका कमी शिकलेल्या पंतप्रधानामध्ये आजच्या युवकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
-
आपण सध्या २१व्या शतकात जगत आहोत. जगभरात विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. पण जेव्हा मी आपल्या पंतप्रधानांना असं सांगताना ऐकतो की गटारात पाईप टाकून त्याच्या घाणेरड्या गॅसवर चहा किंवा जेवण बनवलं जाऊ शकतं, तेव्हा मला फार वाईट वाटतं, असा टोलाही सिसोदियांनी लगावला आहे.
-
दरम्यान, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून वाद निर्माण झालेला असताना याआधी देशाला लाभलेल्या पंतप्रधानांचं शिक्षण किती होतं? याचीही माहिती धुंडाळली जात आहे.
-
१. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे १६ वर्षांहून जास्त काळ पदावर होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण घरीच झालं होतं. पुढील शिक्षणासाठी ते लंडनमघल्या हॅरो इथं गेले. त्यानंतर नेहरूंनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून Natural Science या विषयाचं शिक्षण घेतलं. त्यांनी इनर टेम्पल इनमधून कायद्याचंही शिक्षण घेतलं होतं.
-
२. नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्री देशाचे पंतप्रधान झाले. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान म. गांधींच्या आवाहनानंतर ते वाराणसीतल्या सरकारी शाळेतून बाहेर पडले. पुढे वाराणसीच्या काशी विद्यापीठानं शास्त्रींना पदवी प्रदान केली.
-
३. ताश्कंद येथे लाल बहादूर शास्त्रींचं निधन झाल्यानंतर नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. स्वित्झर्लंडमधील इकोल नॉवेल, जिनिवातील इकोल इंटरनॅशनल, पुण्यातील प्युपिल्स ओन स्कूल, ब्रिस्टलमधील बॅडमिंटन स्कूल, विश्वभारती, शांतीनिकेतन आणि ऑक्सफोर्डमधील सोमरवेल कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. कोलम्बिया विद्यापीठाकडून त्यांचा डिस्टिंक्शनबद्दल सन्मानही करण्यात आला होता.
-
४. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर मोरारजी देसाई देशाचे चौथे पंतप्रधान झाले. त्यांचं शालेय शि७ण सेंट बुसार हाय स्कूलमधून झालं. मुंबई प्रांतातून १९१८ साली त्यांनी विल्सन सिव्हिल सर्विसमधून पदवी प्राप्त केली.
-
५. मोरारजी देसाईंनंतर चरणसिंह यांनी फक्त १७० दिवसांसाठी पंतप्रधानपद भूषवलं. त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली होती. तसेच, आग्रा विद्यापीठातून १९२५ साली त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. दिवाणी खटल्यांचे वकील म्हणून त्यांनी गाझियाबादमध्ये प्रॅक्टिसही केली होती.
-
६. चरणसिंह यांच्यानंतर इंदिरा गांधींचे पुत्र राजीव गांधी देशाचे सहावे पंतप्रधान झाले. त्यांचं शालेय शिक्षण वेलहेम बॉयज स्कूल आणि डून स्कूलमध्ये पार पडलं. केम्ब्रिजचं ट्रिनिटी कॉलेज आणि लंडनच्या इम्पेरियल कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाही कोर्स केला होता.
-
चंद्रशेखर राव यांच्यानंतर पी. व्ही. नरसिंहराव देशाचे नववे पंतप्रधान झाले. त्यांचं शालेय शिक्षण कतकुरू गावात झालं. उस्मानिया विद्यापीठाकडून त्यांना बॅचलर्स ऑफ आर्ट्स डिग्री देण्यात आली होती. हिसलॉप कॉलेजमधून त्यांनी त्यांचं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं.
-
८. १९९० साली चंद्रशेखर यांचं सरकार केंद्रात सत्तेत आलं. उत्तर प्रदेशच्या सतीश चंद्र पीजी कॉलेजमधून त्यांनी बीएची डिग्री घेतली होती. तर अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
-
राजीव गांधींनंतर २ डिसेंबर १९८९ रोजी व्ही. पी. सिंह देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी पूना युनिव्हर्सिटी आणि अलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.
-
१०. चंद्रशेखर राव यांच्यानंतर १३ दिवसांसाठी पंतप्रधानपद भूषवलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी खऱ्या अर्थाने १९९८ साली त्यांच्या पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळाची सुरुवात केली. त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत ग्वालियरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयाचं एमएचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं.
-
११. एच. डी. देवेगौडा यांनी जून १९९६ ते एप्रिल १९९७ या काळात देशाचं पंतप्रधानपद भूषवलं. त्यांनी हसनच्या एलव्ही पॉलिटेक्निक कॉलेजमधून सिव्हिली इंजिनिअरिंग डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केलं होतं.
-
१२. देशाचे १२वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचं आधी बीकॉम आणि नंतर एमएचं शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांनी पुढे पीएचडीही पूर्ण केली होती. शिवाय त्यांना मानद डि.लिट पदवीनंही सन्मानित करण्यात आलं होतं.
-
१३. यूपीएच्या कार्यकाळात कार्यभार हाती घेतलेले मनमोहन सिंग देशाचे तेरावे पंतप्रधान ठरले. त्यांचं उच्च माध्यमिक शिक्षण पंजाब विद्यापीठात झालं. पुढे ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या न्यूफिल्ड कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्राची डिग्री घेतली. त्यापाठोपाठ अर्थशास्त्रातच डी. फिलचं शिक्षणही त्यांनी पूर्ण केलं.
-
१४. २०१४ साली नरेंद्र मोदी देशाचे १४वे पंतप्रधान झाले. त्यांच्या शिक्षणासंदर्भात सध्या वाद सुरू असला, तरी त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या माध्यमातून राज्यशास्त्र विषयात पदवी शिक्षण घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय, गुजरात विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”